शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 17:53 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली.

ठळक मुद्देदेशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगली आरोग्य मिळावे यासाठी केंद्रातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे

अंबाजोगाई : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. राजकिशोर मोदी यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. यामुळे कचरामुक्त शहर होण्याच्या दृष्टीने अंबाजोगाईची वाटचाल सुरु झाली आहे.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगली आरोग्य मिळावे यासाठी केंद्रातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. केंद्राच्याच धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे यास प्राधान्य आहे. यामध्ये समाविष्ट करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास अंबाजोगाई येथे मान्यता मिळावी यासाठी नगर पालिकेने प्रस्ताव पाठविला होता. यासाठी नगराध्यक्षा रचना मोदी यांच्या वतीने राजकिशोर मोदी यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर या पाठपुराव्यास यश येऊन अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.९ एप्रिल रोजी शासनाने तसे परिपत्रक काढले आहे. 

अंबाजोगाई नगर परिषदेने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत आजवर राज्यस्तरीय आणि विभागीय पातळीवर प्रथम, द्वितीय क्रमांकाची पारितोषिके सातत्याने पटकाविली आहेत. यामुळे देखील अंबाजोगाईच्या प्रकल्प मागणीचा विचार प्राधान्याने करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाईसाठीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन ‘निरी’ या संस्थेने या प्रकल्पांचे मूल्यांकन केल्यानंतर शासनाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च केंद्र सरकार तर निम्मा खर्च राज्य सरकार करणार आहे. प्रकल्पास मान्यता दिल्याबद्दल मोदी यांनी राज्य शासनाचे आणि साथ देणारे सर्व नगर परिषद सदस्य, मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांचे स्वागत केले.

४.९८ कोटींचा निधीकचरा मुक्त शहर होण्याच्या दृष्टीने अंबाजोगाई शहाची वाटचाल सुरू आहे. त्या दृष्टीने राजकिशोर मोदी यांनी पाठपुरावा करुन अंबाजोगाईसाठी ४ कोटी ९८ लाख ५४ हजार किंमतीच्या या प्रकल्पास मंजुरी मिळाली.९ एप्रिल रोजी शासनातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAmbajogaiअंबाजोगाईfundsनिधीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना