शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

सोसायटीची कर्ज वसुली खिशात घातली,विनापरवानगी पगारही वाढवली;सचिवाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:09 IST

२ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार लेखा परीक्षणात उघडकीस आला

केज ( बीड ) : सचिवाने संचालक मंडळाला विश्वासात न घेता जास्तीचा पगार घेणे आणि कर्ज वसुलीचा भरणा न करता २ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार तालुक्यातील पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीत उघडकीस आला आहे. लेखापरीक्षणात हा अपहार उघडकीस आला. याप्रकरणी सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाड याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील पैठण येथील सेवा सहकारी सोसायटीचे १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीचे लेखापरीक्षण एतेसामोद्दीन नवाबोद्दीन काझी यांनी केले. यात सोसायटी सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाडने पदाचा गैरवापर करीत मासिकवेतन ७ हजार रुपयावरून संचालकांची मंजुरी न घेता १० हजार रुपायांप्रमाणे घेतले. तसेच कर्जदार सभासदांकडून १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वसूल करण्यात आलेल्या १ लाख ८४ हजार ९०९ रुपायांची रक्कम भरणा केली नसल्याचे उघडकीस आली. 

वेतनातून ८५ हजार रुपये व कर्ज वसुलीची १ लाख ८४ हजार ९०९ रुपये असा २ लाख ६९ हजार ९०९ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लेखा परीक्षक एतेसामोद्दीन नवाबोद्दीन काझी यांच्या तक्रारीवरून सोसायटीचे सचिव राजेंद्र विठ्ठल गायकवाड ( रा. बनसारोळा ता. केज ) याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड