शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परळीत रबरी ट्यूबमधून १२०० लिटर गावठी दारूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:35 IST

Smuggling of 1200 liters of Gawathi liquor through rubber tube in Parli 1200 लिटर गावठी दारू आटोरिक्षासह पोलिसांनी जप्त केली

ठळक मुद्देपोलीस दिसताच रिक्षातील एक जण पळाला

परळी:  शहरातील सुभाष चौकात हातभट्टी दारूची वाहतूक करणारा एक ऑटोरिक्षा संभाजीनगर पोलिसांनी सोमवारी सकाळी ११.३० वाजता ताब्यात घेतला. यावेळी त्यात बारा रबरी ट्यूबमध्ये दारू भरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सर्व ट्यूबमधील जवळपास बाराशे लिटर दारू जप्त करून नष्ट केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे  विना परवाना बेकायदेशीर रित्या गावठी दारूची अवैधपणे निर्मिती केली जाते .ही दारू ऑटोरिक्षातुन रबरी ट्युब मध्ये घेऊन येत असल्याची  माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जमादार व्यंकट भताने, पोलीस नाईक दत्ता गीते ,अर्जुन राठोड , मोहन दुर्गे यांनी सुभाष चौकात नाकाबंदी केली. यावेळी सिद्धार्थनगर कडून  एक आटो रिक्षा येत असलेला पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहताच रिक्षातील एक जण पळून गेला, तर चालक व रिक्षातील गावठी दारू पोलिसांनी ताब्यात घेतली. चालकाचे नाव शिवाजी साहेब राठोड ( रा दारावती तांडा ) असे असल्याचे सूत्रांनी सांगितले. रिक्षाचा क्रमांक एम एच 22 - एच 23 19 असा आहे. तर संशयित फरार आरोपीचे नाव शिवाजी रूपा राठोड ( रा. दारावती तांडा ) असे असल्याची माहिती आहे.

लॉकडाऊन काळातील कारवाईनंतर पुन्हा सक्रीयकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारूचे गाळप चालूच आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीण पोलिसांनी लॉकडाऊन काळात गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करून गुन्हे दाखल केले होते. यानंतरही पुन्हा बेकायदेशीररीत्या गावठी दारूचे उत्पादन सुरूच आहे. दारावती तांडा येथे तयार केलेली दारू परळी शहरासोबत आजूबाजूंच्या तालुक्यातही विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस