शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

अनुदानासाठी सहा गावांचा बँकेसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 11:25 PM

गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्यात यावे. यंदाही हाता तोंडाशी आलेले रबीचे पीक अवकाळी पावसाने गेले. गतवर्षीचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी पोहनेरसह सहा गावांतील शेतकरी ग्रामीण बँकेच्या पोहनेर शाखेसमोर बुधवारी ठिय्या मांडून बसले होते.

सिरसाळा : गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्यात यावे. यंदाही हाता तोंडाशी आलेले रबीचे पीक अवकाळी पावसाने गेले. गतवर्षीचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी पोहनेरसह सहा गावांतील शेतकरी ग्रामीण बँकेच्या पोहनेर शाखेसमोर बुधवारी ठिय्या मांडून बसले होते.गतवर्षी परतीच्या पावसाने या भागात पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यातील इतर गावांत नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ८ हजार रु. अनुदान देण्यात आले. परंतु पोहनेरसह दिग्रस, खतगव्हाण, कासारवाडी, तेलसमुख, रामेवाडी या सहा गावांतील शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. बँकेत वारंवार चकरा मारूनही पदरी निराशाच पडत असल्याने अखेर या सहा गावांतील वीसहून अधिक शेतकरी बँकेच्या दारात ठिय्या मांडून बसले होते. अनुदानाचा धनादेश बँकेत आठ दिवसांपूर्वीच आला आहे तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. रक्कम खात्यात जमा होईपर्यंत हलणार नसल्याचे माजी सरपंच विष्णू रोडगे यांनी सांगितले होते.शाखा व्यवस्थापकाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे४परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी शाखा व्यवस्थापक साईनाथ बेलकर यांच्याशी अनुदाना संदर्भात भ्रमणध्वनीवरून संवाद साधल्यानंतर शाखा व्यवस्थापक बेलकर यांनी सोमवारपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्याने सायंकाळी ७.३० वा. ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन