बीड : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार अंतिम दिवस होता. यावेळी सहा विधानसभा मतदारसंघात छानणीनंतर २०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. पैकी ८७ उमेदवारांनी माघार घेतली असून, ११५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, सहा विधानसभा मतदारसंघासाठी तीन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेवराई व माजलगाव - सारादिंदु चौधरी, बीड व आष्टी - प्रांजल यादव, केज व परळी - इस्त्राईल इंगटी तसेच पोलीस निरीक्षक म्हणून बाबूलाल मीना यांचा समावेश आहे. नागरिकांना निवडणुकीसंदर्भात काही अडचणी किंवा तक्रार असेल तर त्यांच्याशी संपर्क करु शकतात. २१ आॅक्टोबर रोजी मतदानादिवशी सुटी जाहीर आहे. नागरिकांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले.छाननीनंतरची अंतिम उमेदवार संख्यामतदारसंघ वैध अर्ज माघार अंतिमगेवराई 28 9 19माजलगाव 56 31 25बीड 51 1 7 34आष्टी 24 15 9परळी 28 12 16केज 15 3 12एकूण 202 87 115
बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये ११५ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:10 IST
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार अंतिम दिवस होता. यावेळी सहा विधानसभा मतदारसंघात छानणीनंतर २०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.
बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये ११५ उमेदवार रिंगणात
ठळक मुद्देविधानसभा रणधुमाळी : ८७ जणांची माघार - जिल्हाधिकारी