शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

'शांत बसा, नाही तर...'; चोरट्यांनी धमकी देत एक लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने पळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:57 IST

चोरटे समोरच्या इमारतीच्या छतावर झोपलेल्या बिहारी मंजुरांच्या कॅमेर्‍यात कैद; आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल 

- नितीन कांबळेकडा- दाराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरात प्रवेश करत एक लाखांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने लुटल्याची घटना सोमवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या दरम्यान कडा येथील धामणगाव रोडवर घडली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील धामणगाव रोडलगत व्यापारी दिलीप बलदोटा यांचे घर आहे. सोमवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या दरम्यान दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी व्यापारी बलदोटा यांच्या घरात प्रवेश केला. चाहूल लागताच कुटुंबातील सदस्य जागे झाले. मात्र, चोरट्यांनी आरडाओरड करू नका, चुपचाप बसा अन्यथा वाईट होईल, असा दम भरला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि एक लाख रूपये रोकड असा २ लाख ३२ हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. दिलीप बलदोटा यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे करीत आहेत.

चोरटे व्हिडीओ कॅमेर्‍यात कैदघरफोडी करून चोरटे पळून जात होते. याचवेळी समोरच्या घराच्या छतावर झोपलेल्या बिहारी मजुरांना चोरटे नजरेस पडले. त्यांनी लागलीच मोबाईलमध्ये चोरांच्या हालचाली कैद केल्या. तसेच पोलिसांना माहिती दिले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच चोरटे तेथून पसार झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड