शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कासार समाजाचा शिरूर तहसीलसमोर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:08 IST

देशाच्या लोकसंख्येत अत्यल्प असलेल्या कासार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या सवलती प्राप्त होण्यासाठी भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मंगळवारी मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. याबाबत लेखी निवेदन घेण्यास तहसील प्रशासनातील अधिकारीच नसल्याने ते निवेदन आवक जावक विभागाकडे देण्यात आले.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : भटक्या प्रवर्गात समावेश करण्याची मागणी; तीव्र स्वरुपात लढा उभारण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : देशाच्या लोकसंख्येत अत्यल्प असलेल्या कासार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या सवलती प्राप्त होण्यासाठी भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मंगळवारी मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. याबाबत लेखी निवेदन घेण्यास तहसील प्रशासनातील अधिकारीच नसल्याने ते निवेदन आवक जावक विभागाकडे देण्यात आले.महाराष्ट्रभर विखुरलेल्या या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन बांगडी किंवा भांडे विकणे एवढेच मर्यादित होते. आता या पारंपरिक व्यवसायात भांडवलदारांनी कब्जा मिळवल्याने आर्थिक कोंडीत समाज सापडला आहे. १९५१ च्या पहिल्या मागास वर्ग आयोगाने सादर केलेल्या आहवालात अति मागास असलेल्या जातीमध्ये कासार समाजाचा उल्लेख आहे. हा समाज कासार, कंचारी, कसेरा, ठटेरा, कैसरवाणी, तमेरा, बुगरी, काचारी, कंसारा,ओतारी, ओतनकर, तांबटकर अशा नावाने ओळखला जातो. राज्यात हा समाज सोमवंशीय क्षत्रीय, जैन कासार, वºहाडी कासार, तांबट कासार अशा पोटजातीत विभागला गेला असल्याने राज्यकर्त्यांचे फारसे लक्ष नसते. भटक्या जाती - ब वर्गात समावेश व्हावा यासाठी लढा देत आहे. १९९६ नंतर हा लढा थंडावला होता. आता नव्याने हा लढा सुरू करण्यात आला असून, ओतारी समाज समकक्ष असून देखील १९७७ मध्ये भटक्या -ब प्रवर्गात समावेश केला. मात्र, कासार समाज आजही ओ. बी. सी. प्रवर्गात आहे. जागतिक कासार समाज फाउंडेशनच्या माध्यमातून आता हा लढा तीव्र स्वरूपात उभारला आहे.शासनाने गांभीर्याने घेऊन कासार समाजाचा समावेश भटक्या -ब प्रवर्गात करावा अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.तहसील कार्यालयावर काढलेल्या या मूकमोर्चात अशोक दगडे, भाऊसाहेब गाडेकर या जे. के. एस. च्या पदाधिकाऱ्यासह अर्जुन गाडेकर, दत्ता पाटील, गोविंद पाटील, आतिश गाडेकर, जगन्नाथ भांडेकर, प्रमोद दगडे, सुधीर भांडेकर, संतोष भांडेकर, संदीप पाटील, संतोष भांडेकर, वाय. जी. गाडेकर, अमोल पाटील, नंदू भांडेकर, प्रकाश भांडेकर, राम दगडे, सागर दगडे, गोरख गाडेकर, विलास दगडे, गणेश भांडेकर, लक्ष्मण दगडे, दिनेश गाडेकर, नागेश गाडेकर, सचिन अंदुरे, सुशील गाडेकर, भोला दगडे, ऋषिकेश दगडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिकagitationआंदोलन