शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांमुळे सिद्धीविनायक संकुल परिसर ‘हार्ट आॅफ सिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:17 IST

सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देभारतभूषण क्षीरसागर : व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्थैर्य, शांतता विकासाची ग्वाही

बीड : पूर्वी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आपल्याला बाहेरगावी जावे लागत होते. पण शहरात व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शहरातील बाजारपेठा फुलत आहेत. सहयोगनगर, स्नेहनगरची मागील काळात काय परिस्थिती होती याची आपल्या सर्वांना कल्पना असून, सिध्दीविनायक संकुलाच्या उभारणीनंतर या भागाची ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.शिवसेना, भाजपा, मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील स्नेहनगर भागातील दिलीप लोढा यांच्या निवासस्थानी कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.कालीदास थिगळे, नगरसेवक विष्णू वाघमारे, बाळासाहेब अंबेकर, सत्यनारायण कासट, महावीर समदरिया, राजेश बंब, पारस छाजेड, मनोज कोटेचा, आनंद छाजेड, दिलीप लोढा, प्रकाश दामा आदींची उपस्थिती होती.यावेळी डॉ.क्षीरसागर म्हणाले, १९८५ पासून शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करीत असून, मला कधीही आमदारकीचे स्वप्न पडले नाही. स्व.काकू- नानानंतर अण्णा हे घराचे कर्ते आणि मोठे बंधू असून, आम्ही घराची परंपरा पाळण्याचे काम केले. रा.काँ.पक्षाने घरात दुही निर्माण केली तर तब्बल चार निवडणुकीत पडलेल्यांना विरोधी पक्ष नेता केले तर जनतेतून निवडून आलेल्या अण्णांची पक्षात नेहमीच अवहेलना झाली. या बाबीला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय झाला.शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अण्णांना मंत्रीपदाची संधी दिली. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एकाच बैठकीत जिल्ह्यासह शहर विकासासाठी भरघोस निधी दिला. आमच्या परिवाराने कधीही जाती, पातीचे राजकारण केले नाही तर स्व.काकूंनी दिलेल्या मानवता धर्माच्या आदर्श शिकवणीचे पालन करीत असल्याचे ते म्हणाले.शहरातील सुभाष रोड, सहयोगनगर, बसस्टँडच्या मागील काँक्र ीट रस्त्याचे काम झाले असून, दळणवळणाची सोय झाली असून, सटवाई मैदान, मित्रनगर, नाट्यगृह रोडवरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रात महायुतीचे सरकार असून राज्यातही युतीचेच सरकार येणार आहे. नव्याने येणाºया सरकारमध्ये अण्णा हे कॅङ्मबनेटमंत्री होणार असून, त्याचा लाभ आपल्याला शहराच्या स्थैर्य आणि विकासासाठी होणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर