धारूर आगारात डिझेलचा तुटवडा असल्याने व मागणी न केल्याने रविवारी दुपारपासून अनेक बसच्या फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. पुणे, अकोला या लांब पल्ल्याच्या दोन व अनेक इतर काही बस रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवासी ताटकळले. डिजेलची मागणी न केल्याने सुटीचा दिवास असल्याने सोमवारी तर वाहतूक डिझेलअभावी ठप्प होणार असल्याचे दिसत आहे. दर आठवड्यात तीन दिवसांना डिझेलचे टँकर लागत असताना सोमवारनंतर टँकर न आल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे समजते. सोमवारी तर प्रवाशांचे हाल होणार आहेत. यामुळे आगाराच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी प्रवासी संघटनेचे नागनाथ सोनटक्के यांनी केली आहे. धारूर आगारातील डिझेल साठा कमी असल्याने काही बस व फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचे वाहतूक निरीक्षक आर. सी. राठोड यांनी सांगितले.
धारूर आगारात डिझेलचा तुटवडा, बससेवा बिघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST