शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

धक्कादायक ! बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 19:57 IST

Sword attack on a minor girl out of one-sided love in Beed वर्षभरापूर्वी पीडित १७ वर्षीय मुलीची ओळख पोपटसोबत झाली होती.

ठळक मुद्दे ‘माझ्याशी का बोलत नाहीस’ असे म्हणत मुलीवर दोन वार केले.

बीड : एकतर्फी प्रेमातून माझ्याशी का बोलत नाहीस, असे कारण काढून एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने सपासप वार केल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी घडली. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली असून, बीडमधीलच एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, आरोपी फरार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोपट बोबडे (२७, रा. महालक्ष्मी चौक, रामनगर, ता. बीड), असे आरोपीचे नाव आहे. वर्षभरापूर्वी पीडित १७ वर्षीय मुलीची ओळख पोपटसोबत झाली होती. पोपट बोबडे हा तिच्याशी मोबाइलवर बोलत असे. दरम्यान, एप्रिल २०२० मध्ये पोपट बोबडे अचानक तिच्या घरी गेला. यामुळे कुटुंबियांनी मुलीला जाब विचारला. तो अचानक घरी आल्यामुळे तिने ‘तू येथे का आलास’ अशी विचारणा करीत त्याच्याशी बोलणे बंद केले. यानंतर तिला कुटुंबियांनी बीडमधील घरी ठेवले. आठ दिवसांपूर्वी आई आजारी असल्याने पीडित मुलगी गावी आली होती.

३० डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तिचे आई-वडील किराणा आणण्यासाठी गेले होते. घरी वृद्ध आजोबा होते. पीडित मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर पोपट बोबडे याने पाठीमागून येऊन अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला केला; परंतु हा वार तिने हातावर झेलला. त्यानंतर ती खाली कोसळली. ‘माझ्याशी का बोलत नाहीस’ असे म्हणत पोपटने पुन्हा तिच्यावर दोन वार केले. यानंतर तो तेथून पसार झाला. पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या पायाला दोन फ्रॅक्चर झाले आहेत. आरोपीविरोधात ग्रामीण ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे तपास करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस