शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ५० हजारांसाठी ३ वर्षांच्या चिमुकल्यासह मजूर महिलेस डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 19:25 IST

crime in Beed : ऊसतोडीच्या ५० हजार उचलसाठी मुकादमाची दमदाटी

ठळक मुद्देमुकादमाकडून महिलेचा विनयभंग दिंद्रुड ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

दिंद्रुड (जि. बीड) : ऊसतोडीच्या ५० हजार रुपयांसाठी राजेवाडी (ता.माजलगाव) येथील मजूर महिलेचे तीन वर्षांच्या चिमुकल्यासह अपहरण ( Kidnapping ) केले. परभणी जिल्ह्यात डांबून तिचा विनयभंग केला. त्यानंतर, रिक्षातून तिला परत पाठवून दिले. हा धक्कादायक प्रकार ३ ऑक्टोबर रोजी समोर आला. या प्रकरणी दिंद्रुड ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद झाला. ऊसतोड मुकादम लक्ष्मण गोविंद गायकवाड, सचिन त्रिमुख जाधव, देविदास गोविंद गायकवाड व संजूबाई लक्ष्मण गायकवाड (सर्व रा.गंगाखेड, जि.परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. ( Shocking! For Rs 50 thousand women kidnapped along with 3 yr child ) 

राजेवाडी येथील पीडित २५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, ती पतीसोबत ऊसतोडीचे काम करते. तिला दोन मुले व एक मुलगी आहे. गतवर्षी नात्यातीलच मुकादम लक्ष्मण गायकवाड याच्याकडून उचल घेऊन पीडित महिला पतीसह कर्नाटकात ऊसतोडीसाठी गेली होती. ५० हजार रुपये पीडितेकडे शिल्लक होते. ५० हजार रुपयांसाठी मुकादमाचा तगादा सुरू होता. १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पीडितेचे पती बाहेरगावी होते. यावेळी लक्ष्मण गायकवाड हा इतर तिघांसमवेत घरी आला. त्याने पीडिता तिचा तीन वर्षांचा मुलगा या मायलेकरांना बळजबरीने जीपमध्ये (एमएच ४६ बी-३११८) बसविले. तिला थेट गंगाखेड येथे नेऊन एका खोलीत डांबले. यावेळी पीडितेला लाथाबुक्क्याने मारहाण करून, लक्ष्मण गायकवाड याने विनयभंग केला. त्यानंतर, रात्री नऊ वाजता पिंपरी (ता.गंगाखेड) येथे एका पत्र्याच्या खोलीत डांबून ठेऊन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दोन दिवस तेथेच डांबल्यानंतर ३ रोजी सकाळी ११ वाजता एका रिक्षातून दिंद्रुड येथे पाठविले.

संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

चारही आरोपी फरारदरम्यान, पीडितेने दिंद्रुड ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला. सर्व आरोपी फरार असून, तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी सांगितले.

शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीBeedबीड