शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अंगणवाडी सेविकांच्या ग्रुपवर अधिकाऱ्याने टाकला अश्लील फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:33 IST

याच अधिकाऱ्यावर यापूर्वीही महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे.

बीड : शासकीय कामासाठी तयार केलेल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर अंघोळ करतानाचा अश्लिल फोटो टाकल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला. या प्रकरणी शहर विभागाच्या महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात संताप व्यक्त करीत इतर अधिकारी व अंगणवाडी सेविकांनी तक्रार केली. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची मागणी केली असून रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

शासकीय कामात त्वरित व वेळेत संदेश जावा, यासाठी प्रत्येक जण कार्यालयाचा गु्रप तयार करीत आहेत. महिला बाल प्रकल्प विभागानेही अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविकांचा ‘बीड आयसीडीएस अर्बन’ या नावाने ग्रुप तयार केला. यात बीड शहर, गेवराई, माजलगाव, धारूर येथील अनेक महिला अधिकारी, कर्मचारी जोडलेल्या आहेत. याच गु्रपवर महिला बालप्रकल्प अधिकाऱ्याने आंघोळ करतानाचा अश्लिल फोटो टाकला. त्यानंतर या ग्रुपमधून काही क्षणातच महिला बाहेर पडल्या. त्यांनी याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या अधिकाऱ्यावर निलंबन कारवाईसह गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे. तक्रारीवर सहा महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यापूर्वीही गुन्हा दाखलयाच अधिकाऱ्यावर यापूर्वीही महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचे निलंबन झाल्यानंतर तो पुन्हा बीडला आला. आता पुन्हा असे गैरकृत्य त्याने केले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नियमांनुसार कारवाई होईल बीड शहरातील महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार आली आहे. या संदर्भात नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात येईल. - आर. डी. कुलकर्णी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बीड.

टॅग्स :SocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारीBeedबीड