शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! स्वॅब न घेतलेल्या आरोपीला दाखविले कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 19:08 IST

संतापजनक : बीड पोलिसांकडून माध्यमांना दिलेल्या प्रेस नोटमध्ये नावासह पॉझिटिव्ह असल्याचा उल्लेख

ठळक मुद्देकोवीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या आरोपीने पलायन केले होतेपोलिसांनी स्वॅब घेतलेला नसतानाही त्याला पॉझिटिव्ह दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते. 

बीड : शहरातील आयटीआयमधील कोवीड केअर सेंटरमधून एका आरोपीने पलायन केले होते. त्याला मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. यात पोलिसांनी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोभाटा केला आहे. प्रत्यक्षात त्याचा स्वॅबच घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे. बीडपोलिसांनी प्रेस नोट काढून माध्यमांना खोटी माहिती दिल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. त्यामुळे माध्यमांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बीड ग्रामीण पोलिसांनी एका दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड केले होते. या सर्वांचे स्वॅब घेतले असता एक दरोडेखोर कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील इतरांना आयटीआयमधील कोवीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले होते. २५ जुलै रोजी यातील किशोर पवार या दरोडेखोराने तेथून पलायन केले होते. त्याला मंगळवारी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह होता. आम्ही सर्व खबरदारी घेऊन त्याला गायरानातून पकडल्याचा बोभाटा बीड पोलिसांकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या आरोपीला केवळ क्वारंटाईन केले होते. त्याचा स्वॅब घेतलाच नव्हता. स्वॅब नसतानाही पोलिसांनी कामगिरीचा बोभाटा करण्यासाठी माध्यमांना एका प्रेसनोटद्वारे खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याचा स्वॅब घेतलेला नसतानाही त्याला पॉझिटिव्ह दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते. 

कारागृहातही नोंद नाहीआतापर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेले पाच आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्या सर्वांवर जिल्हा रुग्णलयात उपचार करण्यात आलेले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या एकाही रुग्णावर आयटीआयमध्ये उपचार झालेले नाहीत. तसेच या पाचही आरोपींची माहिती कारागृह प्रशासनाला देण्यात आली होती. या पाच मध्ये किशोर पवारचे नावच नसल्याचे कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी सांगितले. आता तो पुन्हा क्वारंटाईन कारागृहात आला असून त्याचा स्वॅब घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

चौकशी केली जाईल कोरोना पॉझिटिव्ह यादीत या व्यक्तीचे नाव सापडलेले नाही. अधिक चौकशी केली जाईल. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

स्वॅब घेतला नव्हतासंबंधित नावाचा व्यक्ती पळून गेला होता, हे खरे आहे. पण तेव्हा तो क्वारंटाईन होता. त्याला सात दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवण्यासाठी सीसीसीमध्ये आणले होते. त्याचा स्वॅब घेतला नव्हता. स्वॅबच नाही तर पॉझिटिव्ह येण्याचा संबंधच येत नाही. - डॉ.अमित बायस, प्रमुख, कोवीड केअर सेंटर आयटीआय बीड

तो आरोपी पॉझिटिव्ह होता. एलसीबीकडून तसे सांगण्यात आले आहे. - विलास हजारे, जनसंपर्क अधिकारी, बीड पोलीस

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटकPoliceपोलिस