शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

धक्कादायक ! १५ महिन्यात ६५१ महिलांच्या काढल्या गर्भपिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 17:13 IST

खाजगीत शस्त्रक्रिया करायची असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षकांची परवानगी बंधनकारक

ठळक मुद्देसरकारीपेक्षा खाजगीत दुप्पट शस्त्रक्रिया गरज नसतानाही महिलांना पाठविले सीएसकडे

बीड : जिल्ह्यातील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण अद्यापही थांबलेले नाही. गरज नसतानाही काही महिलांना परवानगी घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले जात असल्याचे सोमवारी दिसले. तपासणी केल्यानंतर गरज नसल्याचे सिद्ध झाले. याच अनुषंगाने माहिती घेतली असता मागील १५ महिन्यात जिल्हाभरात तब्बल ६५१ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारीपेक्षा खाजगीतील आकडेवारी दुप्पट असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचे प्रकरण राज्यभर गाजले. या शस्त्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली. खाजगीत शस्त्रक्रिया करायची असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षकांची परवानगी बंधनकारक केली. त्यामुळे खाजगीतून महिला आली तरी तिची पुन्हा तपासणी केली जात आहे. त्यानंतरच परवानगी द्यायची की नाही, हे निश्चीत करण्यात येते. त्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून होणारी लूट काही प्रमाणात थांबली होती. असे असले तरी शस्त्रक्रियांचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. मागील १५ महिन्यात तब्बल ६५१ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे. या सर्वांना परवानगी दिल्याची नोंद आहे.

सीएसने नाकारली परवानगीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे सोमवारी दुपारी दोन महिला शस्त्रक्रिया परवानगीसाठी आल्या. त्यातील एका महिलेला तपासणी केल्यानंतर खरोखरच आवश्यकता असल्याने परवानगी देण्यात आली. तर दुसऱ्या महिलेला परवानगी नाकारण्यात आली. यावरून खाजगी डॉक्टर आवश्यकता नसतानाही गर्भपिशव्या काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिद्ध होते.

कोरोनाचा घेतला फायदाकोरोना असल्याने नॉन कोवीड रूग्ण व शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. याचा खाजगी डॉक्टरांनी फायदा घेतला. बीड जिल्हा रूग्णालयात केवळ ४ शस्त्रक्रिया झाल्या तर याच तालुक्यात खाजगीत तब्बल १८९ गर्भपिशवी काढण्यात आल्या. यावरून सर्व प्रकाराची प्रचिती समोर येते.

आवश्यकता असणाऱ्यांनाच परवानगीआवश्यकता असणाऱ्यांनाच गर्भपिशवी शस्त्रक्रियाची परवानगी दिली जाते. एप्रिल २०२० ते जून २०२१ पर्यंत खाजगीत ४१० तर सरकारीत २४१ महिलांची गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सरकारीमध्येही शस्त्रक्रिया होत आहेत. परंतू काही गैरसमजुतीमुळे नागरिक खाजगीत धाव घेतात. नागरिकांनी सरकारीवर विश्वास ठेवून शस्त्रक्रिया कराव्यात.डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

अशी आहे आकडेवारी : खाजगीतील शस्त्रक्रिया -बीड 189परळी 84आष्टी 6केज 6---सरकारीतील शस्त्रक्रिया -स्वाराती, अंबाजोगाई 232जिल्हा रूग्णालय 4उपजिल्हा रूग्णालय परळी 4उपजिल्हा रूग्णालय केज 1----खाजगीतील एकूण शस्त्रक्रिया ४१०सरकारीतील एकूण शस्त्रक्रिया २४१

टॅग्स :Womenमहिलाpregnant womanगर्भवती महिलाBeedबीडdoctorडॉक्टर