शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घरात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:30 IST

धानोरा परिसरातील पिंपरखेड रोडलगतच्या घरातून आढळला मृतदेह

- नितीन कांबळेकडा (बीड) - धानोरा परिसरातील पिंपरखेड रोडलगत अर्धवट बांधकाम झालेल्या घरात अंदाजे ३५ ते ४५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.ती महिला कोण,कुठली,तिचा घातपात झाला की नैसर्गिक मृत्यू झाला याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील धानोरा परिसरातील पिंपरखेड रोडलगत असलेल्या एका नवीन घराचे  बांधकाम सुरू असलेल्या घरात कुजलेला मृतदेह असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना समजाताच सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी धाव घेतली. कुजलेला मृतदेह हा महिलेचा असून साधारण ३५ ते ४५ वर्ष वय असल्याचा अंदाज आहे.साधारण आठ दिवसापुर्वीचा हा मृतदेह आहे. 

मृतदेह कुजलेला असल्याने जाग्यावरच शवविच्छेदन करण्यात आले आहे.ठाणे हद्दीतून कोणी महिला मिसींग असेल तर त्यानी माहिती द्यावी.महिलेची ओळख पटवण्यासाठी शोध पत्रिका पाठवण्यात आली असल्याचे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक देवीदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे,सतीश पैठणे,यांनी भेट देऊन पंचनामा केला...  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड