बीड : शिवसैनिक प्रेम देणारा, जिवाला जिव देणारा आहे. विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वानी गट, तट, आपसातील मतभेद आणि मनभेद बाजूला सारून जयदत्तआण्णांच्या विजयासाठी आजपासून कामाला लागा. गाव, वस्ती, तांड्यासह शहरातील प्रत्येक प्रभागातील घराघरापर्यंत धनुष्यबाण पोहोचवा. आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी काम करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते अनिल जगताप यांनी केले.स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबानंतर स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकीच श्रद्धा पंकजाताई यांच्यावर आहे. माझ्या मते पंकजाताई राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात आणि जयदत्तआण्णा क्षीरसागर हे नव्याने येणाऱ्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये कॅबीनेटमंत्री होऊन बीडचे पालकमंत्री व्हावेत, ही भावना व्यक्त केली होेती. पण विरोधकांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास करूण तोडून मोडून बातमी दिली मात्र बीडकर जनता ही सुजाण आणि समजदार आहे. ती आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाली आहे. तेंव्हा माझ्या बोलण्याचा अर्थ केवळ माझे हे दोन्ही आदरार्थी नेते चांगल्या पदावर जावेत, असाच होता. एवढीच प्रामाणिक भावना होती, असे प्रतिपादन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी व्यक्त केले.‘आमच्या नादी नका लागू’शिवसैनिक हे पक्षनिष्ठेने भारावलेले रसायन आहे. स्वत:हून कुणाच्या नादाला लागत नाही आणि कुणी खेटण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत. जात, पात धर्म न बघता शिवसैनिक हा पक्षनिष्ठेला नेहमीच प्राधान्य देत आला आहे, असेही अनिल जगताप यावेळी म्हणाले.
जिवाला जीव देणारा शिवसैनिक बीडमध्ये भगवा फडकविणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 23:59 IST
विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वानी गट, तट, आपसातील मतभेद आणि मनभेद बाजूला सारून जयदत्तआण्णांच्या विजयासाठी आजपासून कामाला लागा.
जिवाला जीव देणारा शिवसैनिक बीडमध्ये भगवा फडकविणारच
ठळक मुद्देअनिल जगताप : जयदत्तआण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार