शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात उस दराबाबत जय महेश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांना शिवसैनिकांचा घेराव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 18:01 IST

उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात तीन साखर कारखाने आहेत. यावर्षी पवारवाडी येथील जय महेश,  तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके व सावरगावच्या छत्रपती अशा तिन्ही कारखान्यांनी दराबाबत संगनमत केले आहे. तिन्ही साखर कारखान्यानी पहिली उचल ३ हजार रुपये द्यावी, उस दर जाहीर करण्यात यावा, कार्यक्षेत्रातील उसाचे आधी गाळप करावे, गाळपानंतर 15 दिवसांत पैसे द्यावेत, 265 जातीच्या उसाची नोंद घेण्यात यावी अशा केल्या मागण्या

माजलगांव ( बीड): उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले.

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात तीन साखर कारखाने आहेत. यावर्षी पवारवाडी येथील जय महेश,  तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके व सावरगावच्या छत्रपती अशा तिन्ही कारखान्यांनी दराबाबत संगनमत केले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त आहेत. सध्या राज्यात सर्वत्र उस दरावरून आंदोलन सुरु आहे. शिवसेनेनेही उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत उस दराबाबत आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. 

त्यानुसार तिन्ही साखर कारखान्यानी पहिली उचल ३ हजार रुपये द्यावी, उस दर जाहीर करण्यात यावा, कार्यक्षेत्रातील उसाचे आधी गाळप करावे, गाळपानंतर 15 दिवसांत पैसे द्यावेत, 265 जातीच्या उसाची नोंद घेण्यात यावी यासह विवीध उस प्रश्नावर डाॅ. उध्दव नाईकनवरे यांनी जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना निवेदन दिले. यावेळी डिगांबर सोळंके, अमोल एरंडे, लक्ष्मणराव सोळंके, पापा सोळंके, राजेश जाधव, अच्युतराव रिंगणे, राधाकृष्ण येवले, विकास झेटे, नामदेव सोजे, विक्रम सोळंके, अतुल उगले, युवराज राठोड, श्रीराम खळेकर, जयराम राउत, उत्तम झाटे, सचिन दळवी, उध्दव शेंडगे, तीर्थराज पांचाळ, दिनेश रिंगणे, मदन कदम, कैलास मस्के, नारायण शेंडगे, युवराज राठोड, धम्मानंद गावढे, संभाजी पाष्टे, अशोक नाईकनवरे यांचेसह शंभर ते दिडशे शिवसैनिक सहभागी झाले होते. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

सेना स्टाईल आंदोलन करणार शेतक-यांच्या उसाचा प्रश्न गंभिर बनला असतांना लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखाना व छत्रपती साखर कारखाना उसाला भाव देत नसल्याने उस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पश्चिम महाराष्ट्ाच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील उस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव मिळाला पाहिजे, याकरीता भाव मिळेपर्यंत सेना स्टाईल आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे डाॅ. उध्दव नाईकनवरे यांनी इशारा दिला आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखाने