शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना उपजिल्हाप्रमुख हल्ला प्रकरण; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 15:31 IST

हल्ल्यास पूर्ववैमनस्य, हद्दपारी प्रकरणाची किनार

ठळक मुद्देयाप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ९ जणांवर गुन्हा नोंद झाला.

बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप (रा.भवानवाडी ता.बीड) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना पुलावरुन फेेकण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ९ जणांवर गुन्हा नोंद झाला. उपजिल्हाप्रमुख जगताप यांच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कुटेवाडी (ता.बीड) येथील उपसरपंच नंदू कुटेसह पाच जणांवर गुन्हा नोंद झाला तर दुसऱ्या गटानेही तक्रार दिली. त्यावरुन जगताप यांच्यासह चौघांवर फिर्याद नोंदवली गेली.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांचे बंधू व दोन पुतणे यांच्यावर नुकतीच हद्दपारीची कारवाई झाली. २६ ऑगस्ट रोजी कारवाईसाठी गेलेल्या पिंपळनेर पोलिसांची जीप गावकऱ्यांनी रोखून धरली होती. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक पार पडली. यात उपजिल्हाप्रमुख जगताप यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून राष्ट्रवादी काँग्रेससहशिवसेना जिल्हाप्रमुखावर आरोप केला होता.अशातच ३० ऑगस्ट रोजी त्यांच्यावर हल्ला झाला. . दरम्यान, यानंतर दुपारी १२ वाजता जरुड- भवानवाडी रस्त्यावर हनुमंत मनोहर जगताप, उर्मिला हनुमंत जगताप, प्रताप हरिदास जगताप, काशिनाथ तुळशीदास जगताप यांनी दगडाने मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार राजेभाऊ नारायण शिंदे (रा. भवानवाडी) यांनी पिंपळनेर ठाण्यात दिली. त्यावरुन गुन्हा नोंद झाला.

दरम्यान, हनुमंत जगताप यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु असून ३१ ऑगस्ट रोजी पिंपळनेर पोलिसांनी जवाब नोंदविला. त्यानुसार अमोल शिवाजी शिंदे, राजेंद्र नारायण शिंदे, योगेश मच्छिंद्र शिंदे, नितीन शिवा जाधव (सर्व रा. भवानवाडी) व रायुकॉ तालुकाध्यक्ष नंदू अंकुश कुटे (रा. कुटेवाडी ता.बीड) व अनोळखी पाच यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. शिवीगाळ करत मारहाण केली तसेच पुलावरुन फेकण्याचा प्रयत्न केला. गळ्यातील सोनसाखळी, ब्रासलेट व पाच अंगठ्या असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

धुमसत होता राजकीय वादशिवसेनेचे जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कुटे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून राजकीय वाद धुमसत होता. यापूर्वीही त्यांच्यात टोकाचे वाद झालेले आहेत. पुन्हा एकदा हल्ला, परस्परविरोधी तक्रारींमुळे ते चर्चेत आले आहेत.दरम्यान, दोन्ही गटाचे लोक फरार असून तपास सुरु असल्याचे पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड