शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

बीड जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:41 IST

घरगुती किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला हातपाय बांधून पेटविल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे आठवड्यापूर्वी घडली होती. यामध्ये महिला ९० टक्के भाजली. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देघरातील किरकोळ वादाने घेतला बळी

लोकमत न्यूज नेटवर्कविडा : घरगुती किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला हातपाय बांधून पेटविल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे आठवड्यापूर्वी घडली होती. यामध्ये महिला ९० टक्के भाजली. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू होते. आठवडाभर तिने मृत्यूशी झुंज दिली. परंतु ती अपयशी ठरली आणि मंगळवारी दुपारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती. या घटनेत घरातील किरकोळ कारणाने एकीचा जीव गेला.

अश्विनी (२३ रा.विडा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर समिर जाधव असे तिच्या पतीचे नाव आहे. ८ मे रोजी समीर आणि अश्विनी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यावेळी समीरने अश्विनीचे बाजूलाच पडलेल्या दोरीन हातपाय बांधले. त्यानंतर रॉकेल अंगावर टाकून तिला पेटवून दिले होते. हा प्रकार मुलांनी पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. शेजारच्यांनी धाव घेत महिलेला अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. आठ दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, महिलेने मृत्यूपूर्व जबाबात अंगावर चिमणी पडून आपण जळाल्याचे सांगितले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर तिने जबाब बदलला होता. आता नातेवाईकांच्या जबाबावरून पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा