शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

लक्ष्मीसह बहिणींच्या जीवनात शांतिवनची ‘प्रकाशज्योत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:24 IST

शिरुर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन प्रकल्पाने आईच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या लक्ष्मीसह तिच्या दोन बहिणींना दत्तक घेत दिवाळी सार्थक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिरुर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन प्रकल्पाने आईच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या लक्ष्मीसह तिच्या दोन बहिणींना दत्तक घेत दिवाळी सार्थक केली. या तिन्ही मुली आता शांतिवनात राहणार असल्याची माहिती संचालक दीपक नागरगोजे यांनी दिली.वंचित उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षण देऊन तसेच नोकरी मिळवून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम शांतिवन प्रकल्पाच्या माध्यमातून दीपक व कावेरी नागरगोजे हे दांपत्य २० वर्षांपासून करत आहे. हा प्रकल्प राज्यातील मोजक्या उत्कृष्ट सामाजिक प्रकल्पांपैकी एक आहे. वंचित, आधाराची गरज असलेल्या मुलांची माहिती मिळताच शांतिवन त्यांना आसरा देते. दीपावलीच्या पूर्वसंध्येला तीन मुलींना शांतिवनने आधार दिला.तागडगाव येथील तुकाराम आधापुरे यांची पत्नी वैशाली यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. त्यांना श्रावणी (वय ७), लक्ष्मी (वय ६) आणि आरती (वय ४) या तीन मुली. आईच्या अकाली निधनाने या मुली उघड्यावर पडल्या. गरिबी, इतरांच्या शेतात काम करून उदरिनर्वाह करणाऱ्या तुकाराम यांच्या समोर मुलींच्या पालन पोषणाचा प्रश्न होता. ही बाब दीपक नागरगोजे यांना कळताच त्यांनी संपूर्ण माहिती घेत या मुलींना शांतिवनात आणून त्यांना आधार दिला.दीपावली जसा प्रकाशाचा उत्सव तसा लक्ष्मीच्या पूजनाचाही! तीन बहिणींना परिवारात सहभागी करत वंचितांच्या आयुष्यात आनंदाची प्रकाशज्योत प्रज्वलीत करुन आदर्श निर्माण करणा-या शांतिवनच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीSocialसामाजिक