शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:45 IST

बीड शहरातील विसर्जन स्थळापासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउत्साहात निघणार श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका : शांतताभंग केल्यास पडणार महागात

बीड : मागील १० दिवस गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झाले होते. बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी बीड शहरातील विसर्जन स्थळापासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.श्री गणेश विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजनपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सर्व नियोजन करण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर सर्व प्रमुख शहरात पथसंचलन करुन पाहणी देखील केली आहे. जिल्ह्यात १४०० च्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. यापैकी काही जणांचे विसर्जन झाले आहे, बऱ्याच ठिकाणचे विसर्जन हे गुरुवारी होणार आहे.बीड शहरात कंकालेश्वर मंदिराच्या जवळील विहिरीत श्री गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. मिरवणुका पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडणार आहेत. कारण कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी प्रशासनाने डीजेवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी वेगळी यंत्रणा पोलिसांकडून उभारण्यात आली असून, त्यासाठी होमगार्ड देखील तैनात असणार आहेत. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.असा असेल पोलीस बंदोबस्तजिल्हाभरात प्रमुख शहरात आवश्यकतेनूसार फौजफाटा तैनात केला आहे. बीडमध्ये मिरवणूक मार्गावर बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मिरवणुका एका रांगेत पुढे-पुढे जाणार आहेत.यावेळी २७ पोलीस निरीक्षक, ८४ सहायक निरीक्षक, फौसदार १२०० पोलीस कर्मचारी ११०० होमगार्ड व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत.‘ड्रोन’चे असणार लक्षजिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये बंदोबस्तासाठी ड्रोनचा देखील वापर केला जाणार आहे. त्यामाध्यमातून लाईव्ह पाहणी मिरवणुकीत केली जाणार आहे. तसेच मिरवणुकींचे चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळावर पाण्यात बुडून कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी पाच जीवरक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तम पोहणाऱ्यांनी पाण्याच्या जवळ थांबून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहान प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :BeedबीडGanpati Festivalगणेशोत्सवBeed policeबीड पोलीस