शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

नगराध्यक्ष चाऊसवर दुसऱ्या गुन्ह्याची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 22:53 IST

अपहारप्रकरणी दाखल अन्य गुन्ह्यात आरोपी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नगराध्यक्षांवर टांगती तलवार आहे.

ठळक मुद्देलेखापालाची कोठडी वाढली, दोघांना अंतरिम जामीन : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तपास

बीड / माजलगाव : येथील नगर परिषदेत अपहार प्रकरणी अटकेत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस व मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांची येथील न्यायालयाने अंतरिम जामिनावर सुटका केली तर लेखापाल अशोक कुलकर्णी यांची दुस-या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी कायम ठेवली आहे. मात्र अपहारप्रकरणी दाखल अन्य गुन्ह्यात आरोपी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नगराध्यक्षांवर टांगती तलवार आहे.येथील नगर परिषदेत १ कोटी ४४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी तीन मुख्याधिकारी व इतर चार कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात नगराध्यक्ष चाऊस यांना बुधवारी नगर परिषद कार्यालयात पोलिसांनी अटक केली होती. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी (वांगीकर) हे दोघे स्वत: पोलिसांकडे हजर झाले होते.या तिघांनाही येथील न्यायालयाने ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे तिघांचीही बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा विभागात कसून चौकशी करण्यात आली. दोन दिवसाच्या चौकशीनंतर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहाल चाऊस, मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना न्यायालयासमोर उभे केले. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.ए वाघमारे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर चाऊस व येलगट्टे यांची ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात येऊन सुटका करण्यात आली.त्यांना पुन्हा ११ मार्च रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. तर लेखापाल अशोक कुलकर्णी यांना दुसºया गुन्ह्यात कायम ठेवून पोलीस कोठडी कायम राहिली आहे.योजनेचे पैसे वळवले : दुसरा गुन्हा दाखलमाजलगाव नगरपालिकेत झालेल्या तक्रारी या २०१२ ते २०१६ या कालवधीमध्ये झालेल्या कामाबद्दल आहेत. दरम्यान या कामाची देयके सहाल चाऊस यांच्याकडे पदभार आल्यानंतर तीन मुख्याधिका-यांच्या कार्यकाळात देण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दुसरा गुन्हा हा योजनेचा निधी लेखाअधिकारी कुलकर्णी यांनी इतर योजनेत वळता केल्याचा देखील दाखल आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना जामिन नाकारून पोलीस कोठडी कायम ठेवली आहे. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची नावे येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Beedबीडnagaradhyakshaनगराध्यक्षCrime Newsगुन्हेगारी