शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात गुन्हेगारांच्या दुसऱ्या पिढीची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:00 IST

काही गुन्हेगारांचा व्यवसायच गुन्हेगारी असल्याचे समोर आले आहे.

- सोमनाथ खताळबीड : काही गुन्हेगारांचा व्यवसायच गुन्हेगारी असल्याचे समोर आले आहे. गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील साहेबराव पवार, भास्कर पवार, मारूती पवार आणि गोविंद पवारनंतर आता त्यांची मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत. परंतु पोलिसांनी वेळीच सापळा लावून नितीन व विलास या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी माजलगाव तालुक्यात एकाच रात्री दोन घरफोड्या केल्या होत्या.

मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी, दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकामंध्ये भितीचे वातावरण आहे. माजलगाव तालुक्यातही गत महिन्यात मंजरथमध्ये दत्तात्रय नांदुरकर तर  किट्टी आडगावमध्ये बालासाहेब कराडे यांचे बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांन तपासाची चक्रे  गतीने फिरविली. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम  पाळवदे यांनी त्यांची टिम तपासाला लावली. महिनाभर शोध घेतल्यानंतर या चोऱ्या नितीन व विलास पवारने केल्याचे समजले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांच्याकडून ४ तोळे दोन ग्राम सोनेही वसुल केल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, वैभव कलुबर्मे, सहायक अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि मिर्झा बेग, सपोनि दिलीप तेजनकर, पोउपनि मरळ, विकास दांडे, मुंजा कुवारे, राठोड, शेख यांनी केली.

सोनपेठच्या सोनाराला दिले सोनेचोरी केल्यानंतर या दोघांनीही चोरीतील दागिने सोनपेठ येथील एका सराफाला विक्री केली होते. पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन संबंधित सोनाराकडून ४२ ग्राम सोने वसुल केले आहे. 

आणखी गुन्हे उघड होणार नितीन व विलास पवारला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४२ ग्राम सोने वसुल केले आहे. आणखी गुन्हे उघड होऊ शकतात. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. - भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक, माजलगााव

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिसArrestअटक