शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बीडमध्ये ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांचे ‘सर्च आॅपरेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:14 IST

जिल्ह्यात पाहिजे, फरारी असलेल्या गुन्हेगारांची संख्या १५७२ एवढी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या सर्व ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांना तात्काळ गजाआड करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे१३ दिवसांत ३८ जण गजाआड : पोलीस अधीक्षकांच्या ठाणेदारांना सक्त सूचना

बीड : जिल्ह्यात पाहिजे, फरारी असलेल्या गुन्हेगारांची संख्या १५७२ एवढी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या सर्व ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांना तात्काळ गजाआड करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले आहेत. यासाठी विशेष पथकही नियूक्त केले आहे. मागील १३ दिवसांत तब्बल ३८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. राहिलेल्या गुन्हेगारांचे ‘सर्च आॅपरेशन’ बीड पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनही कारवाया करु लागले आहेत. पोलीस दलही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये १५७२ आरोपी पोलिसांना हवे आहेत.त्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक विभागाच्या अनुभवी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक अधीक्षकांनी नियुक्त केले आहे.या पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. शिवाय संबंधित ठाण्यांनाही सक्त आदेश दिले असून, सर्व वॉन्टेड गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.बीड शहर ठाणे आघाडीवरजिल्ह्यात २८ ठाण्यांपैकी बीड शहर ठाणे हद्दीत सर्वाधिक ३०१ गुन्हेगार वॉन्टेड आहेत. गेवराई १२६, आष्टी १२५, केज ११४, बीड ग्रामीण ६७, पेठ बीड ६३, शिवाजीनगर ५९, पिंपळनेर २५, तलवाडा २४, चकलांबा ५७, पाटोदा ५३, शिरुर ३६, अंभोरा १७, अंमळनेर १६, अंबाजोगाई शहर ४४, अंबाजोगाई ग्रामीण ३१, परळी शहर ६०, परळी ग्रामीण २७, संभाजीनगर १७, बर्दापूर १४, माजलगाव शहर ७२, माजलगाव ग्रामीण २९, दिंद्रूड १५, वडवणी २५, सिरसाळा १८, धारुर ३५, नेकनूर ७५, युसूफवडगाव २७ असे १५७२ आरोपी पोलिसांना पाहिजे आहेत. मार्च महिन्यात ३८ आरोपींना अटक केली आहे. कलम ८२ नुसार हे आरोपी पोलिसांना हवे आहेत.शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात वॉन्टेड गुन्हेगाराच्या माहिती संदर्भात बैठक घेण्यात आली. यामध्ये ठाणेनिहाय आढावा घेतला, शिवाय केलेल्या कारवायांचीही माहिती घेतली. १५७२ आरोपी पाहिजे असून, १३१ आरोपी फरारीमध्ये आहेत. यामध्ये २ ते ३ वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून काही आरोपी पोलिसांना गुंगारा देत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या सर्वांची माहिती घेणे सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस