शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील २१ वाळू घाटांवर शिक्कामोर्तब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 13:55 IST

Beed News: बीड जिल्ह्यातील २१ वाळू घाट सुरु होणार असून त्या संदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यातच वाळू टेंडर स्वीकृतीला सुरुवात होईल.

- शिरीष शिंदे  बीड : जिल्ह्यातील २१ वाळू घाट सुरु होणार असून त्या संदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यातच वाळू टेंडर स्वीकृतीला सुरुवात होईल. त्या पाठोपाठ वाळू उपसा सुरु होणार आहे. मागच्या वेळी वाळू घाटांच्या टेंडर स्वीकृती प्रक्रियेला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर महिनाभर टेंडर प्रक्रिया चालली. जवळपास २२ वाळू घाटांना मागच्या वर्षी मंजुरी दिली गेली होती. त्यातील दोन ते तीन वाळू घाट काही कारणानिमित्त बंद होते. तसेच गंगावाडी येथील वाळू घाटही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर बंद झाला होता. दरम्यान, यावर्षी लवकरच वाळू घाटच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली. टेंडर प्रक्रिया सुरु करण्याचे काम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिजचे अव्वल कारकून हर्षद कांबळे करीत आहेत. तालुका- वाळूघाट- लिलाव योग्य वाळूघाट माजलगाव-३२-३ गेवराई-५१-१४ परळी-९-३  गेवराईची वाळू क्वालिटीची बीड जिल्ह्यातील इतर वाळू घाटांच्या तुलनेत गेवराई तालुक्यातील वाळू घाटांवरील वाळू क्वालिटीची असल्यामुळे तेथील वाळूला अधिक मागणी असते. तसेच तेथील वाळूला दरही अधिक असतो. गेवराई तालुक्यात सर्वाधिक वाळूची तस्करी होण्याचे हेच मुख्य कारण आहे. त्यामुळेच त्या पट्ट्यात वाळूचे राजकारण अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाळू चोरीची बहुतांश प्रकरणे अधिकाधिक गेवराईतीलच असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. 

नुकतीच झाली बैठक जिल्हाधिकारी शर्मा, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राऊत व गौण खनिजचे अव्वल कारकून हर्षद कांबळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू घाट संदर्भाने नुकतीच बैठक झाली. या बैठकीत २१ वाळू घाटावर शिक्कामोर्तब झाले. ही २१ वाळू घाट जेथे आहेत त्या ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन होकार दिला आहे.

टॅग्स :Beedबीड