शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सततच्या छेडछाडीमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:21 IST

गेल्या दीड महिन्यापासून शाळेत जाताना आणि येताना रस्त्यात छेडछाड

ठळक मुद्देआरोपीच्या वडिलांनी दिली होती धमकीगुन्हा दाखल होताच आरोपी फरार

विडा (ता. केज, जि. बीड): छेडछाडीला कंटाळून विषारी द्रव प्राशन केलेल्या स्वाती बाळासाहेब घोळवे या शाळकरी मुलीचा उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. केज तालुक्यातील विड्यापासून जवळ असलेल्या गप्पेवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी अशोक रामदास केदार या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे. केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील स्वाती बाळासाहेब घोळवे ही गेल्या अनेक वर्षांपासून गप्पेवाडी येथे तिचे मामा हनुमंत आश्रुबा केदार यांच्याकडे राहत होती. सध्या ती शिंदी येथील बुवासाहेब पाटील विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होती. गेल्या दीड महिन्यापासून शाळेत जाताना आणि येताना रस्त्यात अशोक केदार नामक युवक तिला छेडत होता. 

गुरुवारी २५ जुलै सकाळी स्वाती गप्पेवाडी येथून पायी तीन किलोमीटर शाळेसाठी निघाली होती. रस्त्यात अशोक केदार याने दुचाकी आडवी लावून अश्लील भाषा वापरत तिला शिव्या दिल्या. त्यामुळे भेदरलेल्या स्वातीने घरी आल्यानंतर शेतातील कापसावर फवारण्यासाठी आणलेले विषारी द्रव प्राशन केले. ही बाब समजल्यानंतर तिला तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पाच दिवसांनंतर मंगळवारी तिची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी आरोपी अशोक केदार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी  गुन्हा नोंद करण्यात आला. तपास एपीआय मुंडे व विडा बीट जमादार बाळकृष्ण मुंडे, राम चेले व मुकुंद ढाकणे हे करीत आहेत. 

आरोपीच्या वडिलांनी दिली होती धमकीअशोक केदार हा स्वातीला छेडत असल्याची बाब  स्वातीने तिच्या मामाला सांगितली. त्यावर एक महिन्यांपूर्वी मामासोबत श्रीमंत केदार, बाबासाहेब केदार, दत्तात्रय केदार यांनी अशोकचे वडील रामदास यांना भेटून ही बाब सांगितली. यावर अशोकच्या वडिलांनी काय करायचे ते करा, मीच पोलीस ठाण्यात तक्रार देईन असे स्वातीच्या मामाला धमाकवले होते.

टॅग्स :SchoolशाळाSuicideआत्महत्याBeedबीड