शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंडे पालकमंत्री असताना ७३ काेटींचा घाेटाळा’; सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:01 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातर्गंत काडीचेही काम न करता एकूण ७३ कोटी ३६ लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागातर्गंत काडीचेही काम न करता एकूण ७३ कोटी ३६ लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली. २०२१ ते २०२३ या काळात हा गैरप्रकार घडल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी केला.

३० डिसेंबर २०२१ रोजी  २ कोटी २१ लाख, १० कोटी ९८ लाख, २५ मार्च २०२२ रोजी कार्यकारी अभियंता अंबाजोगाई येथील ६ कोटी ५८ लाख, ३१ मार्च २०२२ रोजी बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडून १ कोटी ३२ लाख रुपये बिलापोटी उचलण्यात आले. परळीतील संजय मुंडे हे उपअभियंता असताना, त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदभार दाखवून २५ जून २०२२ रोजी एकाच दिवशी ३७ कोटी ७० लाख रुपये उचलण्यात आले. 

रद्द केलेल्या कामांचेही १४ कोटी रुपये उचलले२५ मार्च २०२० रोजी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या ५७ कामांच्या प्रशासकीय मान्यता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्या होत्या. परंतु अंबाजोगाई बांधकाम विभागांतर्गत असलेल्या या रद्द कामांची १४ कोटी ४३ लाखांची बिले उचलण्यात आली, असा आरोपही आ. धस यांनी पत्रकार परिषदेत केला. 

सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई अंतर्गत रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२ साठी ९ कामांसाठी १५ कोटी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी १ कोटी २० लाख व १६ कोटी २० लाख रुपये काम न करता उचलले.  अर्थसंकल्पीय हॅम अर्थात हायब्रीड अन्युटी अंतर्गत ६९ कोटी रुपयांचे रस्ता काम सुरू असताना, ६ कोटी रुपये मंजूर करून आणले. तसेच, परळी पूस-बर्दापूर कामासाठी ५ कोटी रुपये उचलले.  या कामांची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली असता या कामांवर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. ही बाब क्षेत्रीय कार्यालयाने कळवली असताना सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही, असेही धस म्हणाले.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडे