शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात 'मुक्काम सत्यागृह आंदोलन'; पीक विम्यासाठी कंपनीबाहेर मांडले ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:43 IST

पीक विम्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू 

ठळक मुद्दे2018च्या खरिप पीक विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी

परळी : परळीसह बीड जिल्ह्यातील 63000 शेतकऱ्यांचा सन 2018 चा खरीप व रब्बीचा मंजुर झालेला पीकविमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही. या विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.मात्र कंपनीने दिलेला शब्द पाळला नसून विमा अद्याप जमा केला नाही. यामुळे किसान सभेचे नेते अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे येथे दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वाकडेवाडी येथील कार्यालयासमोर 'मुक्काम सत्यागृह आंदोलन' सुरु करून ठाण मांडले आहे.

आज सकाळी 10 वाजता  शेतकरी या कार्यालयासमोर जमा झाले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. सायंकाळी 5 पर्यंत हे आंदोलन सुरूच होते, जोपर्यंत आमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये परळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तसेच अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, वडवणी  येथील शेतकऱ्यांचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग आहे. यावेळी किसान सभेचे नेते अजित अभ्यंकर ,अजय बुरांडे, दत्ता डाके, डॉ. ज्ञानेश्वर मोठे , सुदाम शिंदे, बालाजी कडबाने, मुरलीधर नागरगोजे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

विमा कंपनीने शब्द पाळला नाही जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. यापूर्वी गेल्या महिन्यात परळी तालुक्यातील तीनशे शेतकऱ्यांनी येथेच सहा दिवस आंदोलन केले. तेव्हा 15 डिसेंबर पर्यंत  विमा रक्कम  जमा करण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले होते. ते पाळण्यात आले नाही यामुळे आज १२०० शेतकऱ्यांसह हे आंदोलन सुरु आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत या संख्येत वाढ होत राहील. - अजय बुरांडे, किसानसभा

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीBeedबीडPuneपुणे