शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींची संपत्ती जप्त करून नाही, अटक केल्यावर समाधान, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:51 IST

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश दिले. या कारवााईवरुन आता सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.  'आरोपींची संपत्ती जप्त करून नाही, अटक केल्यावर समाधान', असं कुटुंबीयांनी म्हटले आहे. 

Maharashtra Politics : रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

संपत्ती जप्ती आदेशावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, पहिल्या दिवसापासून आम्ही न्याय द्या सांगत आहे. आता सगळा महाराष्ट्र हा न्याय मागत आहे.काल झालेल्या मूक मोर्चामध्ये आम्हाला न्याय देण्याची मागणी केली आहे. काल आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले, पण संपत्ती जप्त करून कुणाचेही समाधान होणार नाही. त्यांना शिक्षा दिल्यानंतरच समाधान होणार आहे. त्यांच्या संपत्तीचं  आम्हाला काही घेणे देणे नाही, असंही धनंजय देशमुख म्हणाले.

 "दमानिया यांनी काल आरोपींची हत्या झाली हे सांगितलं. ते तपासण्याचे काम पोलिसांचे आहे.आरोपींकडे मोठ्या गाड्या आहेत.हे त्यांनी कष्टातून मिळवलेले नाही. त्यांना कोणीतरी प्रलोभन देऊन दिलेले आहे. गुन्हेगारीसाठी हे सर्व कोणीतरी त्यांना दिले आहे. ही सर्व संघटीत गुन्हेगारी आहे. याला कुठेतरी आळा घालण्यासाठी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. फरार आरोपींनी लवकरात लवकर शरण यावे, यासाठी तपास यंत्रणा दबाव वाढवित असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून स्पष्ट झाले. 

बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना असा आदेश शनिवारी दिला की बंदुकीसह ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडPoliceपोलिस