शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:45 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत जुन्या सहकाऱ्याने धक्कादाय खुलासे केले आहेत.

Walmik Karad:बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहिती समोर  आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आका म्हणून समोर आलेल्या वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. अशातच कराडचा जुना सहकारी असल्याचा दावा करणाऱ्या विजयकुमार बांगर यांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत.वाल्मिक कराडच्या मागे एक अदृश्य शक्ती होती असा दावा विजयकुमार बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडने तीन लोकांना माझ्यासमोर मारलं असल्याचा दावाही विजयकुमार बांगर यांनी केला. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. विविध राजकीय पक्षांकडून कराडच्या अटकेची मागणी केली जात होती. त्यानंतर कराडने पुण्यात आत्मसमर्पण केले. आता विजयकुमार बांगल यांनी कराडबाबत धक्कादायक दावा केला. महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडनेचे केल्याचे विजयकुमार बांगर यांनी म्हटलं आहे. "माझ्याप्रमाणे वाल्मिक कराडच्याही मागेही एक अदृश्य शक्ती होती. त्याच्यामागे शासकीय आणि पोलीस यंत्रणा होती. तर माझ्या मागे नितीमत्ता होती. वाल्मिक कराड समाजकार्य करायचा तर खंडण्या का गोळा करायचा. त्याने एवढ्या लोकांना त्रास का दिला. त्याला सत्ता, पैशाचा मोह होता. त्याला जिल्ह्याचा बाप व्हायतं होतं. त्याला बीड जिल्हा ताब्यात घेऊन पूर्ण मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता. वाल्मिक कराडने माझ्यासमोर तीन लोकांना मारलं. महादेव मुंडे प्रकरणाची मला सर्व माहिती आहे. मी त्यावेळच्या एका उच्च अधिकाऱ्याला भेटून सांगितले होते," असं विजयकुमार बांगर यांनी म्हटलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडचा आणखी एक गुन्हा समोर आला होता. वाल्मिक कराडवर राज्यातील १४० शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कृषीमंत्री माझ्या जवळचे आहेत आणि ते तुम्हाला अनुदान मिळवून देतील असे सांगून वाल्मिक कराड यांनी १४० शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. वाल्मिक कराडने ११ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पैसे परत मागितले तेव्हा त्यांना मारहाण करून हाकलून लावण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर त्यांनी याबाब माहिती दिली.

 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण