शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख हत्या:व्हिडीओ हायकोर्टात दाखवतात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नसल्याचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:51 IST

सुनावणीदरम्यान या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी न्यायालयात अर्ज केला होता.

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी बीड येथील मकोका न्यायालयात पार पडली. यावेळी बचाव पक्ष आणि अभियोग पक्ष यांच्यात पुराव्यांच्या देवाण-घेवाणीवरून युक्तिवाद झाला. "हल्ल्याचे व्हिडीओ उच्च न्यायालयात दाखविले जातात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नाहीत," असा आक्षेप घेत आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पुढे ढकलली असून, आता दि. २३ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सदरील प्रकरणातील सर्व आरोपींवर शुक्रवारी दोषारोप निश्चिती होणे अपेक्षित होते. मात्र, बचाव पक्षाने ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’च्या कलम २३० ची पूर्तता झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जोपर्यंत आम्हाला सर्व पुरावे आणि व्हिडीओ मिळत नाहीत, तोपर्यंत दोषारोप निश्चितीची घाई का केली जात आहे? असा सवाल बचाव पक्षाने केला. त्यावर तपास अधिकारी आणि सहायक सरकारी वकिलांनी स्पष्ट केले की, संबंधित व्हिडीओ त्वरित उपलब्ध करून दिले जातील, मात्र लॅपटॉपचा फॉरेन्सिक अहवाल येण्यासाठी ३० दिवसांचा अवधी लागेल.

उज्ज्वल निकमांना बदलण्यासाठी अर्जसुनावणीदरम्यान या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी न्यायालयात अर्ज केला होता. निकम हे भाजपचे खासदार असून, त्यांची नियुक्ती राजकीय शिफारशीवरून झाल्याचा दावा आरोपींनी केला. मात्र, अशा अर्जाला कोणताही कायदेशीर आधार नाही आणि ते या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली.

हा निव्वळ वेळकाढूपणासरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून बचाव पक्षाकडून केवळ वेळकाढूपणा केला जातोय. आरोपी चक्कर येण्याचे नाटक करत आहे, मात्र त्याचा ईसीजी रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे. २३ डिसेंबरला तरी चार्ज फ्रेम व्हावा आणि खटला सुरु व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे." आम्ही फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय पाहिजे.

सरकारी वकिलांची भूमिकासहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले की, आम्ही घटनेचा पेनड्राइव्ह बचाव पक्षाला दिला आहे. त्या पेनड्राइव्हमध्ये काही चित्रपट नाही, तर घटनेचा पुरावाच आहे. जे पुरावे सध्या आमच्या ताब्यात नाहीत (लॅपटॉप), ते आम्ही देऊ शकत नाही. नागपूर खंडपीठाच्या एका निकालानुसार, अतिरिक्त पुरावे देण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज नसते. केवळ वेळ काढण्यासाठी आरोपींकडून हे प्रयत्न सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Santosh Deshmukh Murder Case: Defense Objects to Video Evidence Access

Web Summary : Defense in Santosh Deshmukh murder trial protests denial of video evidence shown in High Court. Accused seek Ujjwal Nikam's removal, alleging political bias. Court adjourned hearing for evidence review. Victim's brother accuses defense of stalling; prosecution claims full evidence provided.
टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या