शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार कृष्णा आंधळेच्या वॉरंटसाठी अर्ज, सुनावणी पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:21 IST

४ ऑगस्ट रोजीची सुनावणी ही विष्णू चाटे व इतर आरोपींनी दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जांच्या युक्तिवादासाठी होती.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सोमवारी नियोजित असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या अनुपस्थितीमुळे आणि आरोपी विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर फिर्यादीचे म्हणणे न आल्याने ही सुनावणी आता १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी माध्यमांना माहिती दिली की, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीसाठी येऊ शकले नाहीत, त्यामुळे पुढील तारीख देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. याशिवाय, फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या नावावर वॉरंट काढण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपी विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर फिर्यादीचे म्हणणे येणे बाकी असल्यानेही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

न्यायालयाचा आदेश अद्याप नाहीआरोपींचे वकील ॲड. विकास खाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ४ ऑगस्ट रोजीची सुनावणी ही विष्णू चाटे व इतर आरोपींनी दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जांच्या युक्तिवादासाठी होती. तसेच, मागील सुनावणीच्या तारखेला वाल्मीक कराड यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाने आपले म्हणणे सादर केले होते. जामीन अर्ज आणि दोषमुक्तीच्या अर्जांवर युक्तिवादासाठी आपली तयारी होती, असे ॲड. खाडे यांनी न्यायालयाला कळवले. मात्र, सरकारी पक्षाने मुदत मागितल्याने न्यायालयाने ती मंजूर केली. याशिवाय, सरकारी पक्षाने संपत्ती जप्तीचा अर्ज दाखल केला होता, तर वाल्मीक कराड यांच्या गोठवलेल्या बँक खात्यावरील निर्बंध उठवण्यासाठी बचाव पक्षाने अर्ज दिला होता. या दोन्ही अर्जांवर युक्तिवाद पूर्ण झाले असले तरी, न्यायालयाचा आदेश अद्याप आलेला नाही आणि तो प्रलंबित आहे. ‘प्रत्येकाला संधी मिळणे आवश्यक आहे, त्यानुसार आरोपींनी अर्ज केलेले आहेत, त्यावर सरकारी पक्ष युक्तिवाद करेल आणि न्यायालय निर्णय घेईल’, असे ॲड. खाडे म्हणाले. वाल्मीक कराड याच्या बँक खाती, शेत आणि घर अशा मिळकतींवर तात्पुरते निर्बंध घालण्याचा किंवा अटॅचमेंट (जप्ती) करण्याचा अर्ज सरकारी पक्षाने केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण