शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू प्रकरण खाकीतील बड्या अधिकाऱ्यांच्या येणार अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:09 IST

वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी पोलीस खात्यातील कोणत्या खात्याला व अधिका-याला किती हप्ता दिला जातो याचे निवेदन दिले होते. या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हर्ष पोद्दार यांनी शनिवारी हाती घेतली. त्यामुळे पोलीस विभागात खाबुगिरी करणा-या अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी पोलीस खात्यातील कोणत्या खात्याला व अधिका-याला किती हप्ता दिला जातो याचे निवेदन दिले होते. याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक अधीक्षक जी.श्रीधर यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल पोद्दार यांच्याकडे दिला आहे. परंतु या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वाळू प्रकरण काही बड्या अधिका-यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कारवाई केल्यानंतर अनेक ठिकाणी वाळू साठ्यावर कारवाई झाली होती. जिल्ह्यातील वाळू ठेकेदार व वाहतूकदारांनी कोणत्या नियमांचे पालन करावे यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस ठाण्याच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीमध्येच एक पोलीस अधिकारी म्हणाले, ‘हे वाळूवाले चोर आहेत, आदेश द्या साहेब यांना आत टाकतो’ मात्र, तो अधिकारी बैठकीला येण्यापूर्वीच वाळूच्या हप्त्याचे पैसे घेऊन आल्याचे बैठकीच्या ठिकाणी कोणीतरी बोलले. त्यामुळे पोलीस व वाळू वाहतूकदार व ठेकेदार यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. यानंतर वाळू ठेकेदार व वाहतूकदारांनी महसूल व पोलीस खात्यातील ‘हप्तेखोर’ अधिका-यांची यादी देत कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले होते.याच प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी उविभागीय अधिकारी मुळे यांना एकतर्फी कार्यमुक्त केले होते. तसेच इतर तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला होता. मंडळअधिकारी व तलाठी यांना निलंबित केले होते. मात्र, निवेदन देऊन देखील पोलीस खात्यातील एकाही अधिका-यांवर कारवाई झालेली नाही. तसेच वाळू ठेकेदार व वाहतूकदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, निवेदनात ज्या विभागांची नावे आली आहेत त्यांच्या प्रमुखांची मात्र कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.कॉल रेकॉर्ड तपासण्याची होती मागणीवाळू ठेकेदार व वाहतूकदारांनी निवेदनात संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिका-यांचे हप्ते गोळा करणा-या कर्मचा-यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती.मात्र, पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ अधिका-यांपर्यंत अर्थपूर्ण व्यवहार झालेला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळटाळ केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.होणार खांदेपालटनवीन पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर सर्वच विभागातील जुन्या अधिका-यांचा पदभार काढून खांदेपालट केली जाणार असल्याची देखील माहिती आहे. कारण वाळू प्रकरणात दिलेल्या निवेदनात पोलीस खात्यातील कोणत्या खात्याला किती हप्ता दिला जातो याचा देखील उल्लेख होता. त्यामुळे या निवेदनात आलेल्या खात्यांचे प्रमुख बदलले जाणार असल्याची चर्चा आहे.नवीन पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्षवाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिलेल्या निवेदनावर नवीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडून संबंधित पोलीस अधिका-यांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाळू प्रकरणातील निवेदनामध्ये ज्यांनी स्वाक्षरी केल्या होत्या त्यांच्यातील काही जणांना धमकावल्याचे देखील सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Beed S Pपोलीस अधीक्षक, बीडsandवाळूCorruptionभ्रष्टाचार