शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांकडून तहसीलदारांवर धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 11:58 IST

माजलगाव तालुक्यात गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होते.

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव (बीड ) : येथील तहसीलदार वर्षा मन्नाळे आणि त्यांच्या पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर आज सकाळी शृंगारवाडी येथे कारवाई केली. मात्र, कारवाईमुळे आक्रमक झालेल्या वाळू माफियांनी तहसीलदार मन्नाळे आणि त्यांच्या पथकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

माजलगाव तालुक्यात गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होते. वर्षा मन्नाळे या एक महिन्यापूर्वी येथे तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या आहेत. त्या आज सकाळी आपल्या पथकासह तालखेडकडे जात होत्या. दरम्यान, टाकरवन येथून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर शृंगारवाडी फाट्याजवळ आली. तहसीलदारांची गाडी पाहताच चालकांनी ट्रॅक्टर सुसाट पळवले. यावेळी एक ट्रॅक्टर पलटी झाले तर दुसरे ट्रॅक्टर पथकाने पकडले.

दरम्यान, ट्रॅक्टर पकडताच वाळूमाफियांनी धारदार शस्त्र काढून तहसीलदार व त्यांच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पथकातील मंडळ अधिकाऱ्यास मारहाण देखील करण्यात आली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक जमा झाल्याने वाळू माफिया पळून गेले. यात महिला वाळू माफियांचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेने तहसीलदार व त्यांच्या साथीदारांवर धक्काबुक्की केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्याचबरोबर बीडहून येणारे मंडळाधिकारी के.सी. पुराणिक यांच्यावर ट्रॅक्टर घालण्याचा  देखील प्रयत्न यावेळी झाल्याची माहिती आहे.

हल्ला झाला नाही याबाबत तहसीलदार वर्षा मन्नाळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, वाळूचे ट्रॅक्टर आम्ही पकडले होते. त्यातील लोक पळून गेले. हल्ल्याचा प्रकार झालेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडsandवाळू