शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ असताना मिळाला ‘सहारा’; आता शेकडो हात करणार कन्यादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 19:49 IST

‘बालग्राम’मध्ये सोहळा : दानशूरच करणार अहेर अन् बांधणार बस्ता

ठळक मुद्दे या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे.

- सोमनाथ खताळ

बीड : अनाथ, उपेक्षित, वंचित मुलांचा सांभाळ करणाऱ्या बालग्राम अनाथालयातील कन्येचा विवाह सोहळा २३ फेब्रुवारीला पार पडत आहे. वयाच्या १४ व्या वर्षी अनाथ म्हणून आलेली बालिका आता २० व्या वर्षी लग्नबंधनात अडकत आहे. ‘सहारा’ देण्याबरोबरच मायेची ऊब मिळाल्यानंतर आता तिचे कन्यादान केले जाणार आहे. या सोहळ्यात दानशूरच अहेर घेणार असून बस्ता बांधण्याची तयारीही काहींनी दर्शविली आहे. 

मनीषाचे (नाव बदललेले) न कळणाऱ्या वयातच आई-वडिलांचे छत्र हरवले. नंतर ती आत्याकडे आली; परंतु तिचा येथे व्यवस्थित सांभाळ झाला नाही. साधारण १४ वर्ष वय असताना ती काळोखाच्या रात्री पोलिसांना मिळून आली. ती काहीच सांगत नव्हती. म्हणून पोलिसांनी तिला थेट सहारा अनाथालयात आणले. येथे प्रीती व संतोष गर्जे यांनी तिला सहारा आणि आई-वडिलांचे प्रेम दिले. सहा वर्षे पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याबरोच तिचे शिक्षण पूर्ण केले. चांगले स्थळ आल्याने तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगेशने (नाव बदललेले) तिला पसंत करून लग्नाची इच्छा व्यक्त केली. २३ फेब्रुवारीला सकाळी ११.४५ वाजता लग्नाची वेळ ठरविण्यात आली आहे. सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी आदींची उपस्थित राहणार आहेत. पत्रिका वाटपही सुरू आहे.

सुराणा परिवाराने स्वीकारले पालकत्वपरभणी येथील कविता व गौतम सुराणा यांना मुलगी नाही. त्यांनी मनीषाचे पालकत्व स्वीकारण्याबरोबरच कन्यादानाची तयारी दर्शविली आहे. तिला त्यांनी मानसकन्या मानले आहे. लग्नपत्रिकेवर तसा उल्लेखही आहे. तर प्रीती व संतोष गर्जे आणि बालग्राम परिवाराची कन्या, असाही उल्लेख पत्रिकेवर आहे. लग्नानंतर येणे-जाण्यासह सर्व जबाबदारी सुराणा परिवार घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

मदतीचे आवाहनबालग्राम परिवारातील मुलीचे हे पहिले लग्न असणार आहे. त्यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दानशुरांनी सढळ हाताने मदत केली आहे. आणखी मदतीची गरज व्यक्त केली जात आहे. बालग्राम परिवाराला मदत करण्याचे आवाहन प्रीती व संतोष गर्जे यांनी केले आहे. 

१०७ मुलांचा बालग्राम परिवारवेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कैद्यांची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, उपेक्षित, वंचित, निरश्रित अशा विविध गटांतील मुलांचा बालग्राममध्ये सांभाळ केला जातो. सध्या येथे १०७ मुले असून यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. प्रीती व संतोष गर्जे हे तरूण दाम्पत्य या मुलांचा सांभाळ करते. 

टॅग्स :marriageलग्नBeedबीडsocial workerसमाजसेवक