शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासमोर फायरिंग झाली,बाॅम्ब पडले; युक्रेनहून परतलेल्या आष्टीच्या तरुणाचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 15:33 IST

Russia Ukrain War: प्रत्येक विद्यार्थी १० ते १५ लिटर पाणी घेऊन होता. २० किमी चालत प्रवासात अन्न नव्हते, काही सिनिअर विद्यार्थी एनर्जी बार देत.

आष्टी ( बीड ) : काॅलेजच्या पहिल्याच दिवशी २३ फेब्रुवारीच्या पहाटे  बाॅम्बच्या जोरदार आवाजाने आम्ही झोपेतून जागे झालो. तेव्हाचा कळले युद्ध सुरु झाले. त्यानंतर बंकरमध्ये ७ दिवस काढले. मात्र, युद्धभूमीतून निघण्याचा निर्णय घेत आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो, तिथे रेल्वे नव्हती. दरम्यान, आमच्यासमोर फायरिंग, बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर आम्ही सर्वांनी काही अंतर चालत तर काही खाजगी बसने जात बोर्डरवर गाठली. तेथून भारतीय दुतावासाने आम्हाला मायदेशी आणले, असा थरारक अनुभव युक्रेन येथून परतलेला वैद्यकीय विद्यार्थी अनिकेत लटपटे याने कथन केला. तो आज सकाळी आष्टी येथील त्याच्या घरी परतला आहे. 

आष्टी शहरातील मुर्शदपूर येथील भाऊसाहेब लटपटे यांचा मुलगा अनिकेत याने वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमधील खारक्यू येथील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. रशियाने हल्ला केल्याने अनिकेत युक्रेनमध्ये अडकला होता. धाडस आणि सीमेवर आल्यानंतर भारतीय दूतावासाची मदत यामुळे अनिकेत सुखरूप मायदेशी परतला आहे. युक्रेनमधून दिल्ली आणि आज सकाळी ८ वाजता अनिकेतचे शहरात आगमन झाले. यावेळी औक्षण करून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

माझ्यासमोर फायरिंग झाली युद्धभूमीत बाहेर पडण्याचा थरारक अनुभव यावेळी अनिकेतने सांगितला.  शैक्षणिक पहिल्या वर्षाचा पहिला दिवस २३ फेब्रुवारी बॉम्बस्फोटाच्या मोठ्या आवाजाने सुरु झाला. त्यानंतर समजले की रशियाने युद्ध सुरु केले आहे. हॉस्टेलमधील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी बंकरमध्ये आश्रय घेतला. २ तारखेला येथून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो. तिथे रेल्वे नव्हती.दरम्यान, आमच्या समोर फायरिंग झाली, बॉम्ब पडले. यामुळे आम्ही सर्वांनी चालत जात सीमा गाठण्याचे ठरवले. प्रत्येक विद्यार्थी १० ते १५ लिटर पाणी घेऊन होता. २० किमी चालत प्रवासात अन्न नव्हते, काही सिनिअर विद्यार्थी एनर्जी बार देत. काही अंतर पार केल्यानंतर खाजगी बस करून आम्ही सीमा गाठली. येथे भारतीय दुतावासाने मदत करत दिल्लीत आणले. तेथून महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आज सकाळी घरी आलो, असा अंगावर शहरे आणणारा अनुभव अनिकेत याने कथन केला.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाBeedबीडEducationशिक्षण