शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

बीडमध्ये ग्रामीण आरोग्य यंत्रणा ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:40 IST

जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदांचा ताप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण आरोग्य विभागात १ हजार २ पैकी तब्बल ४२० पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्दे१००२ पैकी ४२० पदे रिक्त : योजनांची अंमलबजावणी अन् सामान्यांना सेवा देण्यास अडचणी; पदे भरण्याची मागणी

सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा आरोग्य विभागात रिक्त पदांचा ताप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण आरोग्य विभागात १ हजार २ पैकी तब्बल ४२० पदे रिक्त आहेत. यात यंत्रणेचा कणा समजली जाणारी वर्ग ३ व ४ च्या ४०२ पदांचा समावेश आहे. यामुळे योजना, उपक्रमांची अंमलबजावणीसह सेवा तत्पर मिळत नसल्याचे समोर आले आहे. ही पदे भरण्यास आरोग्य विभाग उदासिन असल्याचे दिसते.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अस्थापनेवर गट-अ ची १२८, गट-ब ची २०, गट-क व ड ची ८५४ पदे मंजूर आहेत. गट-अ व ब मध्ये १४८ पैकी १८ पदे रिक्त आहेत. यात अतिरिक्त जिल्ला आरोग्य अधिकारी, माता व बालसंगोपन अधिकारी यांचा समावेश आहे. तर आरोग्य विभागाचा कना समजल्या जाणारी वर्ग ३ व ४ ची पदे मात्र निम्मेच रिक्त आहेत. एकीकडे दिवसेंदिवस लोकसंख्या आणि रुग्णसंख्या वाढत चालली आहे तर दुसऱ्या बाजूला रिक्त पदांचा आकडाही कमी व्हायला तयार नाही. ५० टक्के पदे रिक्त असल्याने आहे त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. याच अधिकारी, कर्मचाºयांचे आरोग्य या कामामुळे धोक्यात आल्याचे दिसत आहे. अनेकांना ताणतणाव, मधुमेह, रक्तदाब अशी असंसर्गजन्य आजारांचीही लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.लसीकरण, उपक्रम, योजनांसाठी धावपळआरोग्य विभागाकडून सामान्यांसाठी विविध योजना, लसीकरण मोहीम, उपक्रम घेतले जातात. हे सामान्यांपर्यंत घरोघरी जावून पोहचविण्याची सर्वात जास्त जबाबदारी ही वर्ग ३ व ४ ची असते. मात्र, हीच पदे रिक्त असल्याने यांची अंमलबजावणी करताना आरोग्य विभागाल अडचणी येत आहेत. तर आहे त्या कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात धावपळ होताना दिसत आहे.शल्य चिकित्सकांची आस्थापनाही रिकामीचजिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थेतील वर्ग १ ची ४४ पैकी ३४ पदे रिक्त आहेत. तसेच वर्ग २ ची १४५ पैकी २० पदे, वर्ग ३ मध्ये ४४२ पैकी १४१ पदे, वर्ग ४ ची ४१३ पैकी १०९ पदे रिक्त आहेत.विशेष म्हणजे स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधीक्षक अशी महत्वाची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. तसेच परिचारीकांवरही ताण येत असल्याने नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल