शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात १२४२ गावे स्मशानभूमीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:25 IST

बीड : जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींसह संलग्न वाड्या, वस्त्या आदी १५०० पैकी केवळ २५८ गावांमध्येच स्मशानभूमीची योजना राबवण्यात आली आहे. उर्वरित १२४२ गावांत मात्र स्मशानभूमी उभारलेली नसल्याने अंत्यसंस्कारप्रसंगी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या ४ वर्षात १३ कोटींपेक्षा अधिक निधी या योजनेवर खर्च करण्यात आला आहे.विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या ...

बीड : जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींसह संलग्न वाड्या, वस्त्या आदी १५०० पैकी केवळ २५८ गावांमध्येच स्मशानभूमीची योजना राबवण्यात आली आहे. उर्वरित १२४२ गावांत मात्र स्मशानभूमी उभारलेली नसल्याने अंत्यसंस्कारप्रसंगी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या ४ वर्षात १३ कोटींपेक्षा अधिक निधी या योजनेवर खर्च करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या ग्रामविकास मंत्री आहेत. तरी देखील स्मशानभूमी नसलेल्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गावांमध्ये स्थानिक पातळीवर स्मशानभूमीच्या कामांसाठी निधीची उपलब्धता झाली होती, मात्र कामे अर्धवट ठेऊन निधी खर्च केल्याचे प्रकार देखील काही गावांमध्ये घडल्याच्या तक्रारी आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. ऐनवेळी पाऊस सुरु झाला तर अग्निसंस्कार करण्यातही अडचणी उद्भवतात. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उभारून शेड तसेच सुशोभिकरणाची गरज आहे.

अनेक गावांची मागणी असून देखील प्रशासनाचे धोरण, कंत्राटदार व राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती यामुळे अनेक गावे स्मशानभूमीच्या योजनेपासून वंचित राहिलेली आहेत.अंत्यसंस्कारावेळी जागेवरून होतात अनेकदा वादअनेक गावात प्रत्येक समाजाची अंत्यसंस्काराची जागा वेगळी आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी जागेवरून तेढ निर्माण होऊन गावातील शांतता भंग होते. त्यामुळे शासनाने सर्वांसाठी एकच जागा उपलब्ध करुन स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मांजरसुंबा, नेकनूर, चौसाळा भागातील सरपंचांनी केली आहे.

१००७ ग्रामपंचायतींचे आले प्रस्तावस्मशानभूमी बांधण्यासाठी २०१० मध्ये शासनाने जनसुविधा योजना राबवली होती. मागील आठ वर्षात जिल्ह्यात फक्त २५८ गावांमध्येच स्मशानभूमीचा निधी खर्च करुन कामे केली आहेत. यापैकी अनेक गावांमधील कामे अर्धवट असून निधी मात्र संपूर्ण उचलला आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या कामांतही टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार घडले आहेत.

३ कोटी ९९ लाखांचा निधी प्रस्तावितस्मशानभूमीच्या विकासासाठी जिल्ह्यातील १००७ ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविले आहेत. या वर्षाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०१८-१९ मध्ये स्मशानभूमीसाठी ३ कोटी ९९ लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे....तर चौकशीस्मशानभूमीची सुविधा नसलेल्या गावांचे प्रस्ताव जनसुविधा योजनेअंतर्गंत जिल्हा परिषदेला उपलब्ध झाले आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे. यापूर्वी राबवलेल्या योजनेसंदर्भात काही गावांतील कामाबद्दल तक्रारी आल्या तर चौकशी करण्यात येईल.- डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जि.प.बीड.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाzpजिल्हा परिषद