शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’चा रुग्ण आढळल्याची अफवा; आरोग्य यंत्रणेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:19 IST

कल्याणहून परतलेल्या व्यक्तिला सर्दी, खोकला झाल्याचे समजताच त्याला ‘कोरोना’ झाला, अशी अफवा पसरवली. त्यानंतर आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाली.

ठळक मुद्देनागरिकांनी संयम बाळगावा : आरोग्य विभागाकडून विश्वास; पथकाकडून संशयितांची तपासणी

बीड : कल्याणहून परतलेल्या व्यक्तिला सर्दी, खोकला झाल्याचे समजताच त्याला ‘कोरोना’ झाला, अशी अफवा पसरवली. त्यानंतर आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाली. सदरील व्यक्तीची तपासणी केली असता त्याला कोरोनाची कसलीच लक्षणे नसून ही अफवा असल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जावू नये, असे आवाहन पुन्हा एकदा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.कल्याण येथे नोकरीस असलेल्या ३५ वर्षीय इसम गत महिन्यात बीडमध्ये आला. मूळचा तो पाटोदा तालुक्यातीलच असून त्याची बहीणही बाजुच्याच गावातील रहिवासी आहे. गुरूवारी ते बहिणीच्या हट्टापायी तिच्या गावी गेले. त्यांना खोकला असल्याने आणि काही लोकांना ते मुंबई-कल्याणहून आल्याचे समजल्याने त्यांनी याला कोरोनाचे स्वरूप दिले.ही माहिती आरोग्य विभागाला समजताच नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक संबंधित गावात पोहचले. त्यांची तपासणी केली असता त्यांना छातीत दुखणे, लिव्हरवर सुज, उच्च रक्तदाब असे आजार असल्याचे समजले. त्याने कल्याणमध्ये या आजारावर उपचार घेतल्याचे कागदपत्रांची तपासणी केल्यावर समोर आले.असे असले तरी त्याला शुक्रवारी तपासणीसाठी आरोग्य केंद्रात बोलावले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश गुंड यांनी सांगितले. त्याच्यात कोरोनाची कसलीच लक्षणे नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमचे पथक नजर ठेवून असल्याचेही ते म्हणाले.सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नव्हे...थोडासाही खोकला किंवा ताप आला की त्याला कोरोनाचे वळण दिले जात आहे. प्रत्येक सर्दी, खोकला किंवा दुसऱ्या शहरातून आलेल्या व्यक्तीला कोरोना असेलच असे नाही. जर कोणी संशयीत आढळला तर आरोग्य विभाग सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड