शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये निसर्गाचा रुद्रावतार; अतिवृष्टीने अनेक गावे उध्वस्त, शेतीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 09:27 IST

Rain In Beed मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना पुराचा धोका

केज : शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना महापूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व अठरा दरवाजे उघडले आहेत पावसामुळे केज अंबाजोगाई रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने अंबाजोगाई केज वाहतूक बंद झाली आहे 

पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले होते अतिवृष्टीमुळे केज,  तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती  अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही. अखंडित पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने मंगळवारी पहाटे धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या  गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे. 

बीड जिल्ह्यात २३ सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार (दि.२७) पासून तर पावसाने बीड जिल्ह्यात उच्चांकी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे विशेषतः केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील शेकडो गावांची वाताहत झाली आहे. नदी, ओढे ओसंडून वाहत असून विविध पूल पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून ग्रामस्थांनी कालची रात्र भीतीपोटी अक्षरशः जागून काढली. उंदरी नदीचे पाणी नायगाव मध्ये घुसले असून तट बोरगाव शिवार पूर्ण पाण्यात गेले आहे तर सोनिजवळा पाझर तलावाचे पाणी अनेक घरात घुसले. इस्थळ जि.प. शाळेतही पाणी आले आहे. होळणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सोमनाथ बोरगावचाही संपर्क तुटला आहे. शेकडो गावातील शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची गिणतीच राहिली नसून सध्या फक्त स्वतःचा, कुटुंबियांचा आणि जनावरांचा बचाव करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान,  केज, कळंब, भूम, वाशी, चौसाळा, नेकनूर, भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोमवारी रात्री धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने म्हणजेच तीन मीटर पर्यंत  उचलण्यात आले होते. मात्र, तरीही येवा सुरूच असल्याने आज मंगळवारी पहाटे धरणाचे आणखी १२ दरवाजे उघडण्यात आले. सद्य स्थितीत धरणाचे सर्वच्या सर्व एकूण १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यापैकी सहा दरवाजे तीन मीटरने तर १२ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले असून त्यातून ७० हजार ८४६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणीच विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना महापुराचा प्रचंड धोका निर्माण झाला असून नागरिकांनी अतिसतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 

महामार्गासह राज्य रास्ता बंद झाल्याने वाहने खोळंबलीदरम्यान, रात्रीच्या पावसात केज मधील डॉ. थोरात यांच्या रुग्णालयासमोरील तात्पुरता बांधलेला कच्चा पूल वाहून गेला. त्यामुळे केज-अंबाजोगाई रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. या भागातील अनेक दुकाने आणि घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तर, कळंब-अंबाजोगाई रस्त्यावर सावळेश्वर पैठण  येथील पुलावरून पाणी आल्याने हा रास्त देखील बंद झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीड