शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

गेवराई तालुक्यात पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:23 IST

तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या कामाच्या शोधार्थ भटकंती : खाजगी टँकरचा भाव पाचशेवर; ५० ते ६० हजार पशुधन जगविण्याची कसरत

विष्णू गायकवाड।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा निम्मेच झाले. त्यामुळे पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पाण्याच्या टँकर्सचा भाव ५०० रुपयांवर गेला आहे तर ग्रामीण भागात वाडी, तांङयावर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. यावर्षी खरीप हंगामाची सुगी नावापुरतीच झाली असून ऐन पावसाळ्यात शिवार उघड झाला आहे.तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात उसतोडीसाठी स्थलांतर करीत आहेत. मुले कडेवर, मजूर फडावर, असे चित्र असून मजुरांची संख्या शासन दरबारी ५० हजार झाली आहे. मात्र हजारो मजूर कामाच्या शोधात मुंबई, पुणे, हैदराबाद , औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर व कारखाना परिसरात स्थलांतरीत होत आहेत.तालुक्यात जनावरांची संख्या ५० ते ६० हजारांपेक्षा अधिक असून त्याप्रमाणात चारा उपलब्ध नाही. सर्वच समाजाचा पारंपरिक व्यवसाय पशुपालन शेती हा आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे एक ते दोन खंडी गुरेढोरे असतात. तसेच अदालीच्या बोलीने शेतकºयांची जनावरे पाळली जातात. त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे. या गुरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि वैरणच नसल्याने चारा व पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पशु संगोपन गेवराई, शिरसदेवी, उमापूर, मादळमोही, तलवाडा, चकलंबा, पाचेगाव, गढी या गावात छावण्या उघडणे आवश्यक आहे.टँकरसाठी ४६ गावांचा प्रस्तावनागरिकांना दुष्काळाचे चटके मोठया प्रमाणात जाणवू लागले आहेत. सध्या नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. अशा परिस्थितीत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत.पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे १९ नोव्हेंबरपर्यंत ४६ गावाचे टँकर सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव आले आहेत, असे गटविकास अधिकारी के.एम. बागुल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई