शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये रिक्षा चालकाने प्रवाशास पुन्हा लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:30 IST

बीड : रात्रीच्या वेळी बीड बसस्थानकातून रिक्षात बसून घराकडे निघालेल्या वृद्धास रस्त्यातच रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन लुटले. महिन्यापूर्वीच असाच प्रकार घडला होता. रिक्षा चालकांच्या या वर्तवणुकीमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाबासाहेब हरिभाऊ तायड (वय ...

बीड : रात्रीच्या वेळी बीड बसस्थानकातून रिक्षात बसून घराकडे निघालेल्या वृद्धास रस्त्यातच रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन लुटले. महिन्यापूर्वीच असाच प्रकार घडला होता. रिक्षा चालकांच्या या वर्तवणुकीमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाबासाहेब हरिभाऊ तायड (वय ५०, रा. अंकुशनगर) असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तायड हे बाहेरगावाहून रात्रीच्या वेळी बसने स्थानकात आले. उतरल्यानंतर ते येथीलच एका रिक्षात बसून घराकडे निघाले. अंकुशनगरजवळ जाताच आजुबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत चालकाने रिक्षा थांबविला. आपल्या साथीदाराच्या मदतीने तायड यांना धमकी देत त्यांच्याजवळील पैशाची मागणी केली.

याला विरोध केल्याने तायड यांना रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तायड गंभीर जखमी झाले. रिक्षा चालकाने तायड यांच्या खिशातील रोख १५ हजार रुपये काढून घेत तेथून पळ काढला. तायड यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. माहिती समजताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लुटारुंचा शोध घेतला परंतु मिळाले नाहीत, शिवाजीनगर ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा