शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

ठाण मांडून बसलेल्यांना दणका; आरोग्यातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६२ वरून ५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:32 IST

सर्वोच्च न्यायालयात वय वाढीविरोधात बीडच्या सहा अधिकाऱ्यांनी दिले होते आव्हान

- सोमनाथ खताळबीड : राज्यातील आरोग्य विभागातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या हितासाठी राज्यशासनाने सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ वर नेले होते. याला बीडच्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने बीडच्या अधिकाऱ्यांच्या बाजुने निकाल दिल्यावर वय वाढलेल्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला आहे. यामुळे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांसह राज्य शासनाला चांगलीच चपराक बसली आहे.

२०१५ सालापासून ठरावीक अधिकाऱ्यांनी राज्य शासनातील काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा घाट घातला. यामुळे पदोन्नतीस पात्र असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत होता. ३० मे २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १ महिन्यासाठी वय वाढविले, नंतर ३० जून २०१५ च्या निर्णयानुसार ३ वर्षासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर निवृत्तीचे वय ५८ वरून ६० केले. यावर ३ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्कामोर्तब झाले. हा निर्णय ३१ मे २०१८ पर्यंत लागू होता. या कालावधीतील अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमही अनेक ठिकाणी झाला. परंतु अचानक त्यांना सोशल मीडियातून पुन्हा वय वाढविल्याचे आदेश टाकले. त्यामुळे हे अधिकारी पुन्हा त्याच जागेवर ठाण मांडून बसले. याच आदेशाला बीडच्या डॉ.संजय कदम, डॉ.संजीवनी गव्हाणे, डॉ.विकास आठवले, डॉ. ज्ञानेश्वर निपटे, डॉ.मनीषा काळे, डॉ.सतीश शिंदे, डॉ.महादेव चिंचाेळे यांनी मे २०१८ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड.संजय भोसले व ॲड. अविनाश देशमुख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याला २० मार्च २०२० ला न्यायालयाने निकाल देत वाढविलेले वय नियमबाह्य असून ते रद्द करावे. तसेच यापुढे शासनाने असे निर्णय घेऊ नये, असे सुनावले. या निर्णयाविरोधात पुन्हा डॉ.यशवंत चव्हाण, डॉ.एकनाथ माले, डॉ.गोवर्धन गायकवाड, डॉ.रत्ना रावखंडे यांनी आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला. यात त्यांनी उच्च न्यायालयाचा निकाल योग्य असून तोच कायम ठेवण्याबाबत सांगितले. न्या.एस. अब्दुल नझीर, न्या.कृष्णा मुरारी यांनी हा निकाल दिला. याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲड.शिरीष देशपांडे, ॲड.विनय नवरे, ॲड.श्रेयश उदयललीत, ॲड.राहुल चिटणीस, ॲड.सचिन पाटील, ॲड. आदित्य पांडे, ॲड.जीओ जोसेफ यांनी काम पाहिले.

यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा?वय वाढीमध्ये संचालिका डॉ.अर्चना पाटील, डॉ.साधना तायडे, अतिरिक्त संचालक डॉ.सतीश पवार, उपसंचालक डॉ.एकनाथ माले, सहसंचालक डॉ.गोवर्धन गायकवाड यांच्यासह जवळपास २० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील २०० पेक्षा जास्त अधिकारी या वय वाढीमुळे सेवेत कायम आहेत. कोरोनाच्या नावाखाली या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ठाण मांडलेले आहे.

अन्याय दूर, आम्ही समाधानी आहोत जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डाॅ.राधाकिशन पवार यांचे मार्गदर्शनानुसार राज्य शासनाच्या नियमबाह्य कृतीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भोसले यांचेमार्फत २०१८ मध्ये याचिका दाखल केलेली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन आमच्यावरील अन्याय दूर केल्याने आम्ही समाधानी आहोत. आता शासनाने पदोन्नतीबाबत तत्काळ कार्यवाही करावी.- डॉ.संजय कदम, याचिकाकर्ते वैद्यकीय अधिकारी बीड

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार