शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भुंकणाऱ्या कुत्र्यांवर निवृत्त अधिकाऱ्याचा गोळीबार; एका कुत्र्याचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:27 IST

हॉटेलच्या पार्किंगमध्ये बंदूक घेऊन येत केला गोळीबार

परळी (बीड ): शेजारील बिअर बार व हॉटेल मधील पाळीव कुत्री सतत भुंकतात म्हणून चक्क बंदुकीतून गोळी झाडून एका कुत्र्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि 11) सकाळी १०. ३० वाजता येथील धर्मापुरी रोडवरील धारावती तांडा शिवार भागात घडली. या प्रकरणी निवृत्त कृषी अधिकारी रामराज घोळवे विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री आर्म ऍक्ट व प्राणी हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

येथील धर्मापुरी रोडवर निवृत्त कृषी अधिकारी रामराज घोळवेची शेती आहे. या शेतीलगत केंद्रे यांचे बियर बार व हॉटेल आहे. सध्या हे हॉटेल विकास बनसोडे यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेले आहे. बनसोडे यांनी येथे तीन कुत्री पाळली आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मोकाट असलेली कुत्री घोळवे यांच्यावर भुंकत होती. यावरून संतापलेल्या घोळवे यांनी बंदूक हाती घेत कुत्र्यांचा पाठलाग केला. हॉटेलच्या पार्किंगमध्ये येऊन घोळवेनी कुत्र्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात एका कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक कुत्रा जखमी अवस्थेत शिवारातील शेतात पळून गेला असल्याची माहिती आहे. याबाबत परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हॉटेलचे चालक विकास बनसोडे यांनी तक्रार दिली आहे. यावरून रामराज घोळवेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे हे करत आहेत.

परळीत कुत्र्यांची दहशत, नागरिक त्रस्तशहरातील पद्मावती गल्ली व इतर काही भागात कुत्र्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत  निर्माण झाली आहे. कुत्र्यांना पाहून नागरिक घाबरत आहेत. शहरातील नेहरू चौक, जिजामाता उद्यान रोड, पद्मावती गल्ली ,पंचवटी नगर या भागात व अन्य ठिकाणी कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून येणे- जाणे करावे लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे त्यामुळे कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षकाकडेही काही लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु यावर नगरपालिका काही करू शकत नाही असे उत्तर देण्यात येत आहे.

टॅग्स :Beedबीडdogकुत्राCrime Newsगुन्हेगारी