प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद रामप्रसाद येळकर पोकरा प्रकल्पातंर्गत असलेल्या विविध योजना सांगून उमेद अभियान, नाबार्ड बँक कर्ज व पोकरा प्रकल्प अनुदान यांच्या कृतीसंगमातून कृषीपूरक उद्योग स्थापन करण्यासंदर्भात, गावामध्ये डाळ मिल उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची आणि अर्जप्रक्रियेची माहिती दिली. नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राचे समन्वयक महादेव जोगदंड यांनी उपस्थित महिलांना एकत्रित येऊन उद्योग उभारताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला मीराबाई वायबसे, शीतल वायबसे, वृंदावनी वायबसे, उषा डोईफोडे, निकिता डोईफोडे, राहीबाई डोईफोडे, वर्षा डोईफोडे, द्रोपदी डोईफोडे, रागिनी डोईफोडे, मीनाक्षी डोईफोडे, सौमित्रा डोईफोडे, दिनकर डोईफोडे, सूर्यकांत डोईफोडे, नारायण वायबसे, अभिमान डोईफोडे उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशिक्षक पांडुरंग भंडारे, नवचेतना केंद्राच्या कौशल्या थोरात, अश्विनी वायबसे यांनी परिश्रम घेतले.
सेंद्रिय शेतीचे दिले महत्त्व पटवून
या शेतीशाळेत प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद रामप्रसाद येळकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, पिकांवरील घातक किडींची ओळख, मित्र कीटकांची ओळख, योग्य कीटकनाशकाची निवड, लेबल क्लेम, कीटकनाशकांच्या बाटल्यांची विल्हेवाट, कीटकनाशक फवारणी करताना दुर्घटना होऊ नयेत याकरिता शेतमजुरांचे फवारणीचे कौशल्य वाढविण्यासाठी कीटकनाशक द्रावण तयार करणे, संरक्षण कीटचा वापर करण्यासंदर्भात माहिती दिली.