या कार्यक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले नगरपरिषदेचे सीओ साबळे, नायब तहसीलदार सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले म्हणाले, महिला या सक्षम आहेतच, पण त्यांना संधी मिळाली पाहिजे. स्त्रियांनी शिक्षण घेऊन आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे. सीओ साबळे यांनी स्त्री ही जीवनात विविध भूमिका पार पाडत असते. त्यामुळे स्त्रीचे मातृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व याला कोणीही नाकारू शकत नाही. वुमेन्स हॉस्पिटलच्या अधीक्षक डॉ.अरुणा केंद्रे यांनी स्त्रीला फक्त आजच्या दिवशीच मानसन्मान न करता, तिचा वर्षभर गौरव झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी स्वच्छता विभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना प्रत्येकी फेसमास्क, ग्लोव्हज देण्यात आले. यावेळी त्यांची नेत्रतपासणी, रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, कोरोना स्क्रीनिंग करण्यात येऊन मोफत औषधोपचार करण्यात आला. यावेळी कोरोना केअर सेंटरच्या अधीक्षक डॉ.अरुणा केंद्रे यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल त्यांना कोरोना रणरागिणी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव डॉ.विजय लाड, कोषाध्यक्ष डॉ.सचिन पोतदार, डॉ.राहुल डाके, डॉ.नीलेश तोष्णीवाल, डॉ.राहुल धाकडे, अभियंता लहाने, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, शहर समन्वयिका होणमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.लाड, तर डॉ.सचिन पोतदार यांनी आभार मानले.
090321/avinash mudegaonkar_img-20210309-wa0082_14.jpg
अंबाजोगाईत ृायएमए व नगर परिषदेच्या वतीने महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.