यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून शाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नृत्य व देशभक्तिपर भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. यावर्षी विद्यालयाने ऑनलाईन शिक्षणाबरोबरच निबंध, कविता लिहिणे, चित्रकला, कागदकाम यासारख्या ऑनलाईन स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्राचार्य एन. पी. दत्ता यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व हुतात्म्यांना मानवंदना देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा वाघमारे , क्रांती गोगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी चक्कर हिने केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालकांनीदेखील उपस्थिती लावली.