शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

शासन कार्यवाहीची माहिती लोकप्रतिनिधींना द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:45 IST

बीड : जिल्ह्यात सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ४८ तासात पंचनामे पूर्ण ...

ठळक मुद्देप्रीतम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : लोकप्रतिनिधींच्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश

बीड : जिल्ह्यात सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ४८ तासात पंचनामे पूर्ण करून त्याची माहिती सादर करावी. पीक पंचनाम्याबरोबरच गावातील जिवीतहानी, मालमत्ता आणि जनावरांच्या नुकसानीची माहिती देखील सादर करावी तसेच ती लोकप्रतिनिधींना द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत शासकीय यंत्रणांना देण्यात आले.जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत होत असलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. यावेळी आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.खा. मुंडे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे अडचणीतील शेतकºयाला प्रधानमंत्री पिकविमा योजनेतून आणि राज्य व केंद्र शासनातर्फे देण्यात येणाºया निधीतून मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत त्वरित कार्यवाही होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी अर्ज भरण्यास प्रोत्साहन द्यावे. रबी हंगामासाठी शेतकºयांना अडचणी येत आहे. यामुळे शेतकºयांना रेशनवरील धान्य उपलब्ध करून देतानाच जनावरांना चारा उपलब्ध होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे खा. मुंडे म्हणाल्या.यावेळी पाण्डेय म्हणाले, अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आदेशानुसार तातडीने कार्यवाही करावी. कालमर्यादेत काम पूर्ण करण्यास संबंधित अधिका-यांनी सुनिश्चित पद्धतीने काम करावे. अडचण उद्भवल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून तातडीने मार्गदर्शन मिळवून मार्ग काढावा.बैठकीत गाव पातळीवर नुकसानीचे पंचनामे करणाºया अधिकारी-कर्मचाºयांनी घरे, मालमत्ता आणि जनावरांच्या नुकसानीची देखील माहिती आणि पिक विमाचे भरपाईसाठी अर्ज घेतले जावेत यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होतील, असे आदेश पुन्हा एकदा पाण्डेय यांनी दिले. राज्य शासनाने अतिवृष्टीतील आपत्तीसाठी १० हजार कोटी रुपये शेतकºयांना मदतीसाठी तरतूद केली आहे. जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती वेळेत पूर्ण केल्यास जिल्ह्यातील शेतकºयांना यातील मदत देणे शक्य होईल, असे पांडेय म्हणाले.क्लेम सेटल करा नसता विमा कंपनीवर कारवाईचा इशाराजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी यावेळी जिल्ह्यात झालेल्या पावसाची तसेच पीक नुकसानीचे माहिती सादर केली. यावेळी मागील हंगामातील पीक विमा नुकसानीच्या अनुषंगाने विमा कंपन्यांकडून देण्यात आलेल्या भरपाई बाबतची माहिती सादर करण्यात आली. तसेच विमा न मिळालेल्या शेतक-यांकडून प्राप्त तक्रारींबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. सदर विमा कंपन्यांनी या शेतकºयांचा प्रकरणांमध्ये त्यांचे ‘क्लेम सेटल’ करून त्यांच्या रकमा तात्काळ बँक खात्यात लवकर जमा करावा,अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे देखील यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेRainपाऊसBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड