शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मक्तेदारी, घराणेशाही मोडणार; बीड शिवसेनेच्या  नूतन जिल्हाप्रमुखांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 17:23 IST

जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय मक्तेदारी, घराणेशाहीचा शिवसेना ताकदीने विरोध करणार असून अन्याय, हुकूमशाही विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन मुकाबला करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी स्पष्ट केले.

बीड : जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय मक्तेदारी, घराणेशाहीचा शिवसेना ताकदीने विरोध करणार असून अन्याय, हुकूमशाही विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन मुकाबला करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी स्पष्ट केले. रविवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख सुनिल धांडे, चंद्रकांत नवले, बाळासाहेब पिंगळे, विलास महाराज शिंदे, भारत जगताप, बाळासाहेब अंबुरे आदी उपस्थित होते. 

या वेळी सचिन मुळूक म्हणाले, सध्या विकासाची नौटंकी सुरु आहे. कोट्यावधींचा निधी कागदावरच आहे, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहर कचरा डेपो झालाय, दोन्ही क्षीरसागरांच्या भांडणात बीडकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे ते म्हणाले. ग्रामीण शिवसैनिक शिवसेनेशी एकनिष्ठ असून  पक्षप्रमुखांनी दिलेली पक्षवाढीची जबाबदारी यशस्वी पार पाडू अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्वांच्या संमतीने, विचारात घेऊन व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुखपदाच्या निवडी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुका सर्व सहा मतदार संघात शिवसेना स्वतंत्र लढणार असून तीन मतदार संघात भगवा फडकावणारच असा विश्वास खांडे, मुळूक यांनी व्यक्त केला.  वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेचा मुद्दा पुढे करत अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे व ही बाब पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना कळविणार आहे. तर विरोधी पक्ष नेत्यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्टंटबाजी केल्याचा आरोप मुळूक यांनी केला.

‘मातोश्री’चा निर्णय प्रमाण - बाळासाहेब पिंगळेबदल अटळ असतात, मातोश्रीचा निर्णय प्रमाण आहे. या पलिकडे जाऊ शकत नाही.  असे स्पष्टीकरण देत मावळते जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी भूमिका स्पष्ट केली.  पक्षप्रमुखांनी विश्वास दाखविला, शिवसेनेमुळे पदप्रतिष्ठा मिळाल्याचे ते म्हणाले.  ज्या निष्ठेने १३ वर्ष काम केले, तसेच उद्याही काम करणार असून मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढविणार असल्याचे पिंगळे म्हणाले. आगामी निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी म्हणून पक्षप्रमुखांना भेटून विनंती करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीड