शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'जलाशय ठेकेदार मुक्त करा'; माजलगावात भोई समाजाचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 13:58 IST

मागील काही महिन्यांपासून स्थानिक मच्छिमार, भोई समाजाचा ठेकेदार व उपठेकेदार यांच्यासोबत वाद सुरु आहे.

माजलगाव (बीड ) :माजलगाव जलाशय ठेकेदार मुक्त करून स्थानिक भोईसमाज व मच्छिमारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मच्छिमार संघर्ष कृती समितीच्यावतीने आज, गुरुवारी सकाळी  ११:०० वाजल्यापासून सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे.

माजलगांव जलशयावर परंपरागत स्थानिक भोई समाज मासेमारी करत असुन मागील काही महिन्यांपासून स्थानिक मच्छिमार, भोई समाजाचा  ठेकेदार व उपठेकेदार यांच्यासोबत वाद सुरु आहे. यासंदर्भात भोई समाजाकडून नेहमीच वेगवेगळे आंदोलने करण्यात आली आहेत.परंतु संबंधित आंदोलनाची कुठलीही दखल न घेता दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे निगरगट्ट प्रशासनाला जाग आणण्यासाठी समाजाने भोई समाज आणि मच्छीमार संघर्ष समितीच्यावतीने जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

आंदोलनात मच्छिमार संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमा गहिरे, रामनाथ कुंबळे, गणेश परसे, ज्ञानेश्वर कचरे, कैलास भुंगाठे, बंडू मंजरे, सतीश चूनारे, तानुबाई कचरे अनुसया घुंगाटे आदींचा समावेश आहे. तसेच मच्छिमार भोई समाज महिला, मुले आणि वृद्धांसह सामील झाला आहे. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलाशयावर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. 

या आहेत मागण्या : मच्छिमारांवरील खोट्या केसेस मागे घेण्यात याव्यात,माजलगांव जलाशयाचा सन २०१९ ते २०२० पर्यंतचा मासेमारी तलाव ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा,मच्छिमारावर अन्याय करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ अटक करण्यात यावी,माजलगांव जलाशयात खोटे गुन्हे दाखल करुन घेणाऱ्या पोलीस अधिकार्यांना निलंबीत करण्यात यावे.  

टॅग्स :agitationआंदोलनMajalgaon Damमाजलगाव धरणfishermanमच्छीमार